या वेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, क्रीडासमितीचे सभापती उत्तम केंदळे,भाजपाचे शहर प्रवक्ते अमोल थोरात, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, विक्रमादित्य पवार, ऐश्वर्या पवार, अन्नधान्य महामंडळ सल्लागार समितीचे सदस्य पोपट हजारे, भाजपा शहर उपाध्यक्ष अजय पाताडे, निगडी-चिखली मंडलाध्यक्ष महादेव कवितके, निलेश नेवाळे, प्रभागाध्यक्ष संतोष ठाकूर, श्रीकांत कदम, बाळासाहेब गंगावणे, गोरख पाटील, भाजपा उद्योग आघाडीचे अध्यक्ष अनिल माने, अनिकेत बाबर, हिंदुराव पाटील, शशिकांत जगताप, आशिष जगताप, हरजीत बारदा, सुदीप नायर, प्रमोद कर्हाडे, तात्या भोसले, भिमाजी पानमंद, सूर्यकांत शेंडे, आनंदा यादव, शशिकांत जगताप, आशिष जगताप, नामदेव पवार, सुनील डोमटे, राजू वायसे, सुनिता जगताप, कविता हिंगे, दिपाली धानोरकर, प्रीती कुलकर्णी, अक्षता पाताडे, मनाली पाताडे, धनश्री बेंडखळे, अर्चना पाटील, सोनाली हजारे, आरती गंगावणे, सपना पाटील, योगिता केदारी, वैशाली खामकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेवक एकनाथ पवार म्हणाले की, शहरात सद्यःस्थितीत निवडक पर्यटन केंद्रे आहेत. सिंगापूरच्या धर्तीवर चिखली पूर्णानगर येथे जागतिक दर्जाचे तीन मजली पर्यटन केंद्र नागरिकांसाठी खुले होणार आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. पर्यावरणविषयक जाणिवेच्या अभावामुळे निसर्गातील सर्व घटकांचे प्रदूषण होत आहे. दैनंदिन जीवनातील गरजांची मागणी वाढत असल्यामुळे नैसर्गिक संपत्तीवर ताण येत आहे. ही गरज ओळखून शहरात पर्यटन केंद्र विकसित करण्याचे भाजपने ठरविले आहे. त्याचाच भाग म्हणून सेक्टर क्रमांक 18 येथे पर्यटन केंद्राचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे.
तसेच, नद्यांचे संवर्धन, सुशोभीकरण व जलपर्यटन केंद्राची निर्मिती करण्याचे आश्वासन सत्तारूढ भाजपने पक्षाच्या जाहिरनाम्यात दिले आहे. याशिवाय शहराबाहेरील नागरिक भेट देतील, अशा पद्धतीने जागतिक दर्जाची पर्यटन केंद्र विकसित केली जातील, असे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने पूर्णानगरचे पर्यटन केंद्र देशाच्या नकाशावर स्थान मिळवेल, असा दावा एकनाथ पवार यांनी केला आहे.
पवार म्हणाले की, तीन मजली पर्यटन केंद्र असणार आहे. पाथ-वे, हिरवळ, खेळणी, तलाव, पक्षी निरीक्षण, चौपाटी, अॅडव्हेंचर पार्क असून, पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर सुविधा असणार आहेत. भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, पोपट हजारे, ऐश्वर्या पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, गौरी गणपती सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना बक्षीस वितरण करून सन्मानित करण्यात आले. श्रीकांत कदम यांनी सूत्रसंचालन केले. आभार पोपट हजारे यांनी मानले.