पिंपरी :- सेवाज्येष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती द्या अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल अशी मागणी नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवासेनेने आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असून सुद्धा कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांना अद्याप पदोन्नती दिली गेली नाही. कुठल्याही प्रकारच्या त्रुटी नसताना जाणून बुजून त्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित ठेवला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार पात्र असणारे अधिकारी यांची पदोन्नती जर होत नसेल तरी यापूर्वी केलेल्या १३ अधिकाऱ्यांना दिलेली पदोन्नती नियमबाह्य असून त्याबाबत सबळ पुरावे आहेत तरी त्यांच्या नियमबाह्य पदोन्नती रद्द करण्यात यावी अन्यथा जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने थांबविण्यात आलेल्या पदोन्नतीच्या निषेधार्थ महापालिकेसमोर १ नोव्हेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याबाबत निवेदन आयुक्त राजेश पाटील यांना नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवाअधिकारी निलेश हाके यांच्या वतीने देण्यात आले.