पिंपरी :– मनपा सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांवर खापर फोडण्याचा आणि त्यांच्या चांगल्या कामावर ढपका ठेऊन चुकीचे काम लपवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. आयुक्त चांगले काम करीत आहेत. शासन त्यांच्या मागे खंबीर पणे उभे आहे. त्यांनी कोणतीही तमा न बाळगता शहरातील जनतेच्या हिताची कामे करावित. चांगल्या कामाचे कौतुक होणारच आणि असमाधानी लोक ओरड करणारच असे मत, आमदार बनसोडे यांनी व्यक्त केले. खासदार अमोल कोल्हेंच्या महासभेतील उपस्थितीबाबत बनसोडे म्हणाले, हा पक्षादेश आहे. आपले शिलेदार आणि सत्ताधारी कसे काम करतात, चुकीचा विषय बहुमताने रेटून मंजुर करायचा व आर्थिक जुळणी न झालेले विषय दाबून ठेवायचे ही सत्ताधारी पक्षाची पद्धत आहे. खासदार कोल्हे यांनी दिलेल्या भेटीत आमच्या नरगसेकांची सभागृहातील कामगिरी व सत्ताधाऱ्यांची लपवाछपवी समोर आली आहे. पुढील काळात असाच वॉच ठेवण्यात येणार आहे.
शहरातील जनतेची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. खासदारांनी दिलेली भेट अनपेक्षित होती, असे ही बनसोडे यांनी सांगितले. चुकीची कामे होऊ द्यायची नाहीत असा आयुक्तांनी घेतलेला पवित्रा योग्य असुन आयुक्तांच्या कामाचे आम्ही समर्थन करतो व त्यांचा चांगल्या कामाचे निश्चित कौतुक करू तसेच त्यांच्या मागे खंबीर पणे उभे राहू, असे मत बनसोडे यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले. पुढील काळातही पक्ष असेच विविध पदाधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभा कामकाज पाहणीसाठी पाठविणार आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पणे सांभाळली जाईल व पक्षाची सत्ता पुन्हा शहरात येणार असुन त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहे. चांगल्या कामाचे कौतुक करणे ही आमची पद्धत असुन मागील काळात कोणतेच चांगले काम झाले नाही त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे कौतुक करण्याचा प्रश्न नसल्याचे ही एक प्रश्नावर दिलेल्या उत्तरात बनसोडे म्हणाले.