आमदार महेश लांडगे आणि स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन…
पिंपरी, पुणे (दि.16 ऑक्टोंबर 2021) पुणे महानगर परिवहन महामंडळ ची पी एम पी एम एल भोसरी ते मंचर बस सेवा शनिवारी दिनांक 16 ऑक्टोबरपासून पासून सुरू करण्यात आली.
भोसरी बीआरटी बसस्थानक येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून या बससेवेचे लोकार्पण केले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक सागर गवळी, युवा नेते योगेश लांडगे, उद्योजक राहुल गवळी, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन अधिकारी चंद्रकांत वरपे जूनला अधिकारी संतोष माने निगडी डेपो व्यवस्थापक शांताराम वाघेरे भोसरी डेपो व्यवस्थापक रमेश चव्हाण सर व्यवस्थापक संतोष किरवे बीआरटी प्रमुख काळुराम लांडगे कामगार नेते कुंदन काळे, गणेश गवळी, चेकर सुरेश भोईर, विजय आसादे, विलास पाडाळे आदींसह पीएमपीएमएलचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार महेश लांडगे व स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते पहिल्या फेरीचे चालक विठ्ठल थिगळे आणि वाहक रोहिणी शेटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पहिल्या फेरीच्या सर्व प्रवाशांचे कर्मचाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. भोसरी ते मंचर हे अंतर 49 किलो मीटर असून प्रवास भाडे पन्नास रुपये आहे. या मार्गासाठी पाच बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दिवसभरात एकूण दहा फेऱ्या होणार आहेत अशी माहिती भोसरी बीआरटी प्रमुख काळूराम लांडगे यांनी दिली आहे.