पिंपरी :- पुण्यातील बिबवेवाडी भागातील कब्बड्डी खेळाडू मुलीचा निर्घृण हत्त्या करण्यात आली. त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नायब तहसीलदार श्री.धमाले ह्यांना पिंपरी युवासेना व ‘मैत्री ग्रुप’ च्या वतीने करण्यात आली.
तसेच त्या निषेधार्थ समस्थ दापोडी व फुगेवाडीकरांच्या वतीने सर्व राजकीय, सामाजिक, कला, औद्योगिक, क्रीडा , शैक्षणिक, संघटना यांनी मैत्री ग्रुप व पिंपरी युवा सेना यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्या पीडितेला श्रद्धांजली वाहून त्या नराधमांचा जाहीर निषेध करण्यात आला.