सेवा सप्ताहानिमित्त आरंभ सोशल फाउंडेशतर्फे आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी) :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सेवा सप्ताहामध्ये आरंभ सोशल फाउंडेशन व हेल्थ व्हॅल्यू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत अॅक्युप्रेशर थेरपी शिबिराचा प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मध्ये  पिंपरी मोरवाडी येथील कापसे गार्डन हॉल, चिंचवड शाहूनगरमधील पिरॅमिड हॉल आणि विद्यानगर येथील जनसंपर्क कार्यालयात हे शिबीर सुरू आहे. शिबिराचा शुभारंभ माजी उपमहापौर तथा नगरसेवक तुषारभाऊ हिंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. सुजित साळुंखे, जेष्ठ नागरिक संघ मोरवाडी अध्यक्ष माडगूळकर सर, आरपीआयचे दादा शिरोळे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे दीड हजार नागरिकांनी ॲक्युप्रेशर थेरपीचा लाभ घेतला आहे. डायबेटीस, रक्तदाब, संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, मायग्रेन, थायराईड, वाढलेले वजन अशा आजारांसाठी लाभदायी थेरपी लाभदायक ठरत असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिसादामुळे मोरवाडीमध्ये कापसे उद्यान येथे १६ ऑक्टोबरपर्यंत हे शिबिर चालू राहणार आहे. तर, नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे शाहूनगर येथील पिरॅमिड हॉलमध्ये १९ ते २८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत  पुन्हा हे शिबिर आयोजित केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *