पिंपरी -: समाजात काम करत असताना अहंकार बाजूला ठेवून काम करा तरच चळवळ यशस्वी होईल. सामाजिक व धार्मिक चळवळीत काम करत असताना कोणी मोठा नसतो की छोटा नसतो. डाॅ. अशोक शिलवंत यांनी संपुर्ण आयुष्यात काम करत असताना आपल्या विधायक कामालाच महत्तव दिले. त्यांच्या कार्यात कधीही अहंकार जाणवला नाही. सम्राट अशोकाचे विचार त्यांनी अनेक भागात उभे केलेल्या अशोक स्तंभाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे कार्य केले. सम्राट अशोकाच्या विचारांचे ते खऱ्या अर्थाने कृतीशील पाईक आहेत, असे ते आपल्या धम्मदेसनेत म्हणाले. याप्रसंगी त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक दाखले दिले.
अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे संस्थापक डाॅ. अशोक शिलवंत यांच्या प्रथम समृतिदिनानिमित्त ते बोलत होते. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांना डाॅ. अशोक शिलवंत यांच्या नावे विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, कामगार नेते डाॅ. बाबा आढाव यांना डाॅ. अशोक शिलवंत धम्मदीप पुरस्कार, पुणे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष मा. मानव कांबळे व मा. आर. जी. गायकवाड (मा. अध्यक्ष पंचशील संघ बुद्ध विहार) यांना डाॅ. अशोक शिलवंत समाजभूषण पुरस्कार तर कवीवर्य उद्धवजी कानडे आणि कवयित्री अस्मीता चांदणे यांना डाॅ. अशोक शिलवंत काव्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक मा. एकनाथ बागूल व पिंपरी चिंचवड मनपाच्या विद्यमान महापौर उषाताई तथा माई ढोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलालजी सोनग्रा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करुन तसेच डाॅ. अशोक शिलवंत यांना अभिवादन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली . आदरणीय भन्ते राजरत्न व भिक्खूगण यांनी याप्रसंगी सर्वांच्या उपस्थितीत धम्मवंदना घेतली.
याप्रसंगी महापौर माई ढोरे,. राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष- संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर अध्यक्षा- वैशाली काळभोर, माजी महापौर हनुमंत भोसले, माई काटे, नगरसेवक नाना काटे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे,विजय जगताप,नगरसेवक सागर हिंगणे नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, नगरसेवक राजूभाऊ बनसोडे, गोरख मेंगडे (सरचिटणीस – हमाल पंचायत), भाऊसाहेब भोईर, मारूती भापकर, ॲड.गोरक्ष लोखंडे, डाॅ. पवन साळवे, राजाभाऊ गोलांडे, पुरुषोत्तम सदाफुले ,मोहम्मदभाई पानसरे, स्मिताताई कुलकर्णी, शारदाताई मुंढे, मुक्ताताई पडवळ, शेरबहाद्दूर खत्री,फजल शेख, रामदास महाडिक, शरद जाधव, रविंद्र दुधेकर, वसंत साळवे, भाऊसाहेब डोळस, अरुण चाबुकस्वार, डाॅ. प्रकाश नांगरे,प्राचार्य दत्तात्रय देशमुख,संपत गर्जे, माधव अडसुळे , धम्मराज साळवे,सुरेश कसबे, अनिल जगताप,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत- धर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी डाॅ. अशोक शिलवंत यांच्या जावनावरील गीत स्क्रीनवर (पडद्यावर ) दाखवण्यात आले. याप्रसंगी मानव कांबळे , आर. जी. गायकवाड, उद्धवजी कानडे, अस्मीता चांदणे, महापौर उषाताई तथा माई ढोरे, भाऊसाहेब भोईर, रविकांत वरपे, यांनी प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक दिलीप कांबळे यांनी केले तर पंचशील संघ बुद्ध विहाराचे अध्यक्ष विजय गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी चिंचवड मनपाच्या नगरसेविका डॉ.सुलक्षणाताई शिलवंत-धर, अशोक सर्वांगिण विकास सोसायटीचे कार्याध्यक्ष व अशोक नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ॲड. राजरत्न शिलवंत, शिलरत्न शिलवंत यांनी केले.