कुदळवाडीतील आरोग्य शिबिरास नागरीकांचा उस्फुर्त सहभाग..
स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांचा पुढाकार…
पिंपरी (दि. २३ ऑगस्ट २०२१) :- सामान्य नागरिकांना खर्च परवडत नसल्याने डोळ्यांचे उपचार परवडत नाहीत. ही उणीव लक्षात घेऊन आमदार महेश लांडगे युवा मंच व दिनेशभाऊ यादव मित्र परिवाराने पुढाकार घेत, वाहतूक सेवा सप्ताहानिमित्त कुदळवाडी, चिखली भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात तब्बल चारशेपेक्षा जास्त नागरिकांनी डोळ्यांची तपासणी केली. तसेच ३१० नागरिकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
चिखलीतील भैरवनाथ मंदिर, कुदळवाडी मनपा शाळेजवळ या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचे उद्घाटन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव म्हणाले, दृष्टी कमजोर व वेळीच उपचार न केल्यामुळे अनेकांना अपघातांना सामोरे जावे लागते. भल्यामोठ्या खर्चामुळे गोरगरीब नागरिक उपचारापासून वंचित राहतात. या शिबिरात अत्याधुनिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी करून मोफत आयड्रॉप देण्यात आले. काहींना डोळ्यांच्या मोतिबिंदूचा आजार असल्याने त्यांच्यावर सवलतीच्या दरात दुर्बिंणीद्वारे बिनटाक्याची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.