आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून मा. महापौर राहुल जाधव यांचा उपक्रम
पिंपरी (दि. २३. जूलै. २०२१) :- महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निम्मित आमदार महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे मा. महापौर राहुल जाधव आणी दत्तदिगंबर महिला नागरी सह. पत संस्थेच्या चेअरमन सौ. मंगलताई राहुल जाधव यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ०२ जाधववाडी चिखली मधील रिक्षाचालक मालकांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले प्रभागातील जवळजवळ 100 रिक्षाचालकांना यावेळी गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना राहुल जाधव पुढे म्हणाले कि मी पण एक रिक्षाचालक म्हणुन माझ्या आयुष्याची सुरुवात केली होती माझ्या या सर्व रिक्षाचालक मित्रांच्या सहकार्याने आणी प्रभागातील जनतेच्या आशीर्वादाने मी २०१२ साली प्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नगरसेवक झालो पुढे आमदार महेशदादा लांडगे यांच्या आशीर्वादाने या शहराचा प्रथम नागरिक महापौर म्हणुन काम करण्याची संधी मला मिळाली राजकीय जीवनामध्ये राजकारणाच्या या टप्प्यावर मागे वळून पाहता मला माझे पूर्वीचे दिवस आठवले रिक्षाचालकांच्या समस्या आणी त्यांचा जीवनातील संघर्ष मला चांगला माहित आहे म्हणूनच मी आमचे नेते मा. मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिम्मित्त माझ्या वतीने थोडीशी मदत म्हणून रिक्षाचालकांना मोफत गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पिढे बोलताना श्री राहुल जाधव म्हणाले कि रिक्षाचालकांनी सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालान करून व्यवस्थित आपला व्यवसाय करावा. यावेळी अनेक रीक्षचालाकानी आपले मनोगत व्यक्त करताना श्री राहुल जाधव आणी सौ मंगलताई राहुल जाधव यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी सौ मंगलताई राहुल जाधव सोनामताई जांभुळकर श्री बबन जाधव श्री संदीप जाधव श्री. सुनील जाधव श्री बाळासाहेब जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सुभाष धायरकर, श्री. गुलाबराव जाधव, श्री. महेंद्र मंडलिक, श्री. अभिजित गाडे, चिंतामणी शिंदे, बाबू वाळुंजकर श्री. तात्यासाहेब अतकरे श्री. वहिले, श्री. पाटील साहेब श्री राजू शेळके, श्री सुरेश तळेकर इ. मान्यवर तसेच प्रभागातील सर्व रिक्षा संगठनाचे प्रतिनिधी उपस्थित होते श्री प्रताप भांबे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले कोरोनाच्या पार्शभूमीवर मोजक्याच निमत्रीतांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला.