पिंपरी चिंचवड :- आमदार अण्णा बनसोडे यांच्या आमदार निधीतून दापोडी व फुगेवाडी परिसरातील गणेश गार्डन , गणेश हाईट्स, सुखवानी वूड्स या हौसिंग सोसायटी परिसरात विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला, आमदार बनसोडे यांनी यापूर्वीच त्यांच्या स्थानिक विकास निधी अर्थात आमदार निधीमधून वाय. सी. एम. रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन खरेदीसाठी १ कोटी व कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना पी. पी. ई. किट साठी ४५ लक्ष निधी दिलेला होता.

 

दापोडी फुगेवाडी हौसिंग सोसायटी मधील नागरिकांनी परिसरातील अडचणी संबधी आमदार बनसोडे यांच्या कडे गाऱ्हाणे मांडले होते . त्याची तात्काळ दखल  घेत आमदारांनी निवारण केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले . आमच्या सोसायटीचे काम मार्गी लागले असून आमची अडचण आमदारांनी दूर केली आहे , आमच्या मागणीची दखल घेत काम पार पाडले त्या बद्दल आम्ही आमदारांचे आभार मानत आहोत , असे मत गणेश हौसिंग सोसायटीचे चेअरमन श्री रामुताज  प्रजापती यांनी व्यक्त केले .

 

 स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी असून कोरोना मुळे  अनेक नागरिकांचा रोजगार गेला आहे , अनेक जन  आपले काम घरातुन  (Work  From Home ) करत आहेत . त्यासाठी वीजपुरवठ्या संबधी अनेक समस्या आहेत , याबाबत लवकरच दापोडी, फुगेवाडी परिसरात आढावा बैठक घेण्यात येईल असे बनसोडे यांनी सांगितले . पुढील काळात प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन नागरिकांच्या अडचणी समजावून घेणार आहे , व त्या अडचणी सोडवण्यासाठी योजनाबद्द कार्यक्रम आखला जाईल असे आमदार बनसोडे यांनी सांगितले.

 

या प्रसंगी नगरसेवक रोहित अप्पा काटे , नगरसेविका माई काटे , नगरसेवक राजभाऊ बनसोडे , युवा नेते सिद्धार्थ बनसोडे , सनी ओव्हाळ , कार्यकर्ते  व सोसायटी मधील पदाधिकारी व रहिवासी आदी मान्यवर उपस्थित होते  .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *