पिंपरी :- भोसरी येथील डायनोमर्क कंट्रोल कंपनीच्या आँपरेशन विभाच्या व्यवस्थापिका अक्षरा राऊत याना उद्योगसखी तर अँटोमेशन विभागाचे वरीष्ट व्यवस्थापक हेमंत नेमाडे यांना उद्योगसारथी पुरस्काराने राज्याचे महसूल मंत्री मा ना.बाळासाहेब थोरात व मालपाणी उद्योग समुहाचे संचालकला. गिरीश मालपाणी यांच्या हस्ते संगमनेर येथील मालपाणी लान्समध्ये संपन्न झाला. अक्षरा राऊत या डायनोमर्क कंट्रोल कंपनीचे व्यवस्थपकीय संचालक किशोर राऊत यांच्या त्या मोठ्या कन्या आहेत त्या अत्यंत संयमी, शिस्तप्रिय व कामगारांशी स्नेहाचे नाते जपणारे व्यक्तीमत्व म्हणून परीचीत आहेत.
हेमंत नेमाडे या आस्थापनेत कामगार म्हणून काम करत आज ते वरीष्ट व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. कोणतेही काम करत आसतात ते वेळेचे बंधन न पाळता “काम हेच माझे, दैवत आहे.” असे समजून ते ऊद्योग वाढीसाठी प्रयत्नशील असतात.
पुरस्काराला उत्तर देताना अक्षरा राऊत म्हणाल्या की,माझे वडील व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, लहान वर्कशॉपमध्ये काम करुन उद्योग मोठा केला, त्यांच्याच मार्गदर्शनामुळेच आम्ही कामगारांची व कंपनीची प्रगती करू शकलो, मला भारतरत्न जे.आर.डी.टाटा उद्योग सखी पुरस्कार मिळाल्याने माझ्या जिवनात नवचैतन्य निर्माण झाले असुन मी यापुढे आधिक जोमाने काम करीत राहील.
हेमंत नेमाडे म्हणाले कि, हा मिळालेला पुरस्कार माझा नसुन माझ्या सर्व कामगार बंधुचा आहे त्यांच्या सहकार्य मुळे मला शक्य झाले. यावेळी पाच जनांना सन्मानीत करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नानासाहेब वरपे(उद्योग भुषण), अक्षरा राऊत(उद्योग सखी), हेमंत नेमाडे(उद्योग सारथी), सचिन ईटकर(उद्योग मित्र), मारोतराव काळे(उद्योग रत्न), गणेश भांड(उद्योग विभुषन), सतिश आभाळे(कृषीभुषन)यांना ही सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परीषदेच्या वतीने देण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुदाम मोरे, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले, मुरलीधर साठे. मुकूंद आवटे,प्रदिप गांधलीकर, सुरेश कंक, कंट्रोलचे व्यवस्थपकीय संचालक किशोर राऊत, संचालिका सौ. अमिता राऊत, मनूषबळ प्रमुख सुर्यकांत मुळे, केतकी राऊत उपस्थित होते.