पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरात सध्या केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे चालू आहेत अनेक उपनगरात कचरा संकलनासाठी घरोघरी जाऊन कचरा संकलीत केला जातो.परंतु बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या कुडया ओसंडून वाहताना दिसतात. त्यामुळे नागरीकचे आरोग्य धोक्यात आले होते. यावर उपाय म्हणून ‘ह’ प्रभागातील वॉर्ड क्रमांक 31 मध्ये आरोग्य निरीक्षक विनोद कांबळे यांनी सर्व मोठ्या कचरा कुंडयाच्या ठिकाणी दोन तीन दिवस थांबून, कचरा न टाकण्यासाठी प्रबोधन केले व उपनगरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या गाड्याची संख्या वाढवली. गाडी येत नसल्यास संपर्क साधण्याचे आव्हान नागरिकांना केले परत उघडयावर कचरा टाकला तर दंडात्मक कार्यवाही करेल म्हणून नागरिकांना ही सांगितले.
यापूर्वी मयूरनगरीच्या चौकात मोठ मोठ्या दोन कुडया ओसंडून वाहत असे, भाजीवाले व ईतर नागरीक कचरा टाकत असे आजुबाजुच्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याचे गांभीर्य ओळखून नगरसेवक अंबरनाथ कांबळे नी अनेक वेळा सकाळी येऊन जनजागृती केली पण दुसऱ्या दिवशी परंतु जैसे थै,असे होत असे. सध्या आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी आरोग्य मुकादम विनोद कांबळे व सहकारी एका कुंडीच्या जागी दोन तीन दिवस थांबून हात जोडून प्रबोधन करत आहेत. यामुळेच वार्ड कुंडी मुक्त झाला आहे.
यावेळी प्रबोधन करतांना मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष म्हणाले की आरोग्य विभागाच्या वतीने चांगले काम सुरू आहे पण हे काम करत असतांना नागरिकांनी पण सहकाराच्या उक्तीप्रमाणे “ऐकमेकास साहय करु,अवघे धरु सुपंथ” याप्रमाणे सहकार्य करून आपण सर्वजन कुंडीमुक्त आपला वॉर्ड ठेवुन निरोगी आरोग्य करु. यावेळी आरोग्य निरीक्षक, उद्धव डवरी, आरोग्य मुकादम विनोद कांबळे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदड, दशरथ कांबळे, अजबसिंग तामसीकर, आनंदा फड, उपस्थित होते.