– पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन

– गॅस, इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मांडली चूल

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : घरगुती गॅस, इंधन दरवाढ आणि वाढलेली महागाईच्या आगीत सामान्य जनतेला होरपळून टाकण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने चालवलेले आहे. धनदांडग्यांचे, भांडवलदारांच्या भलं आणि गोर गरिबांवर अन्याय करणार हे मोदी सरकार आहे. येणा-या काळात सामान्य जनता या मोदी सरकारला धडा शिकवणार आहे. ही जुलमी राजवट आणि संकटाच्या खाईत लोटणा-या मोदी सरकर उलथून चासवल्याशिवाय राहणार नाही, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली.

केंद्रातील मोदी सरकारने जनतेवर लादलेल्या बेसुमार महागाईच्या विरोधात आज पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या महिला पदाधिका-यांनी चूल पेटवून गॅस दरवाढीचा निषेध केला. “मोदी सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, माणुसकी गेली संपावर, अच्छे दिन जाऊन पाहा पेट्रोल पंपावर, मोदी हैं तो महगाई हैं”, “पेट्रोल डिझेलची सेन्चुरी झाली, मोदींना घरी पाठवण्याची वेळ झाली” अशी जोरदार घोषणाबाजी करत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.

या आंदोलनात  माजी महापौर योगेश बहल, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, पक्ष प्रवक्ते फजल शेख, मुख्य संघटक अरुण बो-हाडे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, विठ्ठल उर्फ नाना काटे, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, गिता मंचरकर, राजू बनसोडे, स्वाती काटे, माजी नगरसदस्य मचिंद्र तापकीर, महम्मद पानसरे, राजेंद्र जगताप, शमीम पठाण, हरेष आसवानी, शाम वाल्हेकर, प्रसाद शेट्टी, तानाजी खाडे, अतुल शितोळे, घनश्याम खेडेकर, भाऊसाहेब सुपे, दत्तोबा लांडगे, शाम जगताप,  युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरसिटणीस विशाल काळभोर, विधानसभा अध्यक्ष संदीप चिंचवडे, पदवीधर शहराध्यक्ष माधव पाटील, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, महिला संघटिका कविताताई खराडे, महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, ओबीसी महिला अध्यक्ष सारिका पवार, भोसरी विधानसभा महिला अध्यक्ष मनीषा गटकळ,  माऊली सुर्यवंशी, योगेश मोरे, गोरक्ष पाषाणकर, युसूफ कुरेशी, गंगा धेडे, पल्लवी पांढरे, संतोष वाघेरे, संजय औसरमल, रशीद सय्यद, बाळासाहेब पिल्लेवार, तानाजी जवळकर, कुशाग्र कदम, अमर अदियाल, निखिल दळवी, महेश झपके, आशा शिंदे, सचिन काळे, संदीप झोंबाडे, विजय कापसे यांच्यासह  राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

वाघेरे पुढे म्हणाले की, “गॅस सिलेंडरच्या दरात रोज वाढत आहेत. तर पेट्रोलने कधीच शंभरी पार केली आहे. 50 रुपये लिटर पेट्रोल देण्या वादा करत अच्छे दिन आणणा-या सरकारने इतके बुरे दिन आज आणले आहेत. मोदी सरकारचे सिलेंडर आताच्या घडीला सामान्य जनतेच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीमध्ये महागाईच्या रुपात आग लावण्याचे काम करीत आहेत. या विरोधात जनता पेटून उठली आहे. सामान्य जनतेच्या मनात प्रचंड चीड आणि आक्रोश आहे. खास करून गृहिणींच्या बजेटमध्ये फार मोठं संकट केंद्र सरकारने निर्माण केले आहे. मोदींच्या केंद्र सरकारने महागाईने व इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून टाकले आहे. जगावं की मरावं, या प्रश्नाचे उत्तर मोदी सरकार जनतेला देवू शकत नाही. देश सतत वेगवेगळ्या संकटाच्या घाईत लोटण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. या सगळ्याचा हिशोब त्यांना सामान्य जनतेला द्यावा लागणार आहे”.

आता सन्मानीय मंत्री स्मृती इराणी पंतप्रधानांना काय पाठवणार?

केंद्रात युपीएचे सरकार असताना इंधनाचे भाव ५० पैसे किंवा १ रुपयाने वाढले तरी भाजपचे लोक आकांडतांडव करत होते.‌  त्यावेळी पंतप्रधानांना बांगड्या पाठवणा-या भाजपच्या महिला नेत्या स्मृती इराणी आज केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्रिपदावर आहेत. आज पेट्रोल, डिझेल, गॅस अशा सर्वच प्रकारच्या इंधनाचे भाव दुप्पट झाले आहेत. तरीही केंद्रतील एकही मंत्री तोंडातून चकार शब्द काढत नाही. आता  सन्मानिय मंत्री स्मृती इराणी पंतप्रधानांना काय पाठवणार, याचे उत्तर त्यांनी सबंध देशातील जनतेला द्यावे, अशा शब्दात संजोग वाघेरे‌ पाटील यांनी भाजपवर परखडपणे टिका केली. तर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी बांगड्या फोडून मोदी सरकारचा निषेध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *