पुणे दि.29 : पुणे शहरातील   आंबिलओढा झोपडपट्टी भागातील काही घरे महानगरपालिकेमार्फत पाडण्यात आली होती. तेथील झोपडपट्टीवासियांची ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी भेट घेतली.

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, स्थानिक पदाधिकारी व झोपडपट्टीतील रहिवासी उपस्थित होते.

यावेळी श्री. राऊत यांनी  झोपडपट्टीवासियांच्या  समस्या जाणून घेतल्या सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे, पावसाळाही सुरु आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने झोपडपट्टीवासियांची घरे पाडण्याची कारवाई करायला नको होती. आंबिलओढा घटनेची चौकशीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *