पिंपरी : समाजाला सुसंस्कृत बनविण्यासाठी आपल काम मोलाचे आहे. येत्या २६ जून रोजी, अमली पदार्थ विरोधी दिन व अवैध वहातुक दिनानिमित्त, व्यसन्मुक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय ते तळेगाव सिटी येथपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी आणि स्माईल व्यसनमुक्ती केंद्र, उरसे यांचेकडून करण्यात आले आहे.
सकाळी साडेदहा वाजता पोलिस आयुक्तालय चिंचवड येथुन श्री कृष्णप्रकाशजी, पोलिस आयुक्त (भा.पो.से.) यांच्या हस्ते स्माईल सायकल रॅलीच्या संपुर्ण कार्यक्रमास उपस्थिती लाभणार असून, व्यसनमुक्त समाज निर्मितीच्या प्रक्रियेला मदत होईल.