प्रतिनिधी – दि. २१ जून –  पिंपरी चिंचवड –  जागतिक महामारी covid-19 अर्थात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासन आदेशाप्रमाणे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आज पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. करुणा अर्थात covid-19 या संसर्गजन्य रोगाला जागतिक संघटनेने जागतिक महामारी घोषित केली व त्यासाठी 14 मार्च 2020 अधिसूचनेनुसार राज्यांमध्ये सदर अधिसूचने चा दिनांकापासून साथीचे रोग अधिनियम 1997 ची अंमलबजावणी सुरू झाली. पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये आशा स्वयंसेविका काम करणाऱ्या सेविकांना प्रति दिन 500 रुपये भत्ता पालिकेने मंजूर करावा आणि त्यांना किमान वेतन लागू करावे या प्रमुख मागण्या आमदार बनसोडे यांच्यासमोर मांडल्या.

राज्यामध्ये covid-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली, covid-19 तिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली त्या कामामध्ये आशा स्वयंसेविका यांचा व गटप्रवर्तक यांचा सक्तीने समावेश करण्यात आला,त्यात अशा सेविकांनीनी घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या, सर्वे करून त्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण अंतर्गत कॅम्प मध्ये हजर राहून कामे करणे, इत्यादी जबाबदाऱ्या आशा स्वयंसेविका यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. तसेच या व्यतिरिक्त त्यांना नियमित नमुने दिलेले 72 पेक्षा जास्त कामे करावी लागत सदर कामाचा बोजा आशा व गटप्रवर्तक यांच्यावर टाकल्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक ताण वाढला प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र,  कॅम्प येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ आठ तासाची ड्युटी लावण्यात आली, काही ठिकाणी संशयीत व्यक्तींची ऑंटीजनटेस्ट टेस्ट केली. आठवड्यातून चार दिवस दररोज दोन ते तीन तास काम असणाऱ्या आशा सेविकांना कोरोना काळात रविवार सह आठवड्यातील सातही दिवस दररोज आठ तासांत प्रमाणे काम  ही करून घेतले, ते ही विनामोबदला. ही गोष्ट अत्यंत चुकीची व खेदजनक असून यावर तोडगा काढण्यासाठी स्वतः आयुक्तांशी चर्चा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी उपस्थित आशा व गटप्रवर्तक यांना दिले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी कोरोना हा संसर्गजन्य आजार पुढील अनेक वर्षे जगात राहणार असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना भविष्यामध्ये सात ते आठ तास ड्यूटी करावी लागणार आहे हे तितकेच सत्य आहे. तसेच तुम्हाला कोरोना योद्ध्यांचा दर्जा देऊन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे किमान वेतन कसे देता येईल यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू न्याय दिला जाईल असे असे आमदार पुढे म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेने 2021 हे वर्ष आंतरराष्ट्रीय हेल्थ अँड केअर वर्कर्स वर्ष म्हणून घोषित केले आहे. आशा सेविकांच्या सर्व समस्या सोडवू असे आश्वासन यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले. कोरोना काळात  काम करताना पिंपरी-चिंचवड शहरामधील कित्येक आशा सेविकांना कोरोनाची बाधा झाली व याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले ही अत्यंत खेदाची बाब आहे.

यावेळी शालिनी शिवशरण, संगीता मोरे, प्रिती रोडे, वर्षा शेगोकर, किरण सोनवणे, ममता येल्लाडे, सरिता गोळे, सुवर्णा पवार, क्रांती होलमुखी, भाग्यश्री जाधव, कल्पना जाधव, नीलम जाधव, रोहिणी भेगडे, शोभा पांचाळ इत्यादी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *