पुणे :- प्रहार जनशक्ती पक्ष चे अध्यक्ष राज्यमंत्री मा. बच्चू भाऊ कडू साहेब यांच्या मार्गदर्शन पुणे जिल्ह्यातील पक्ष विस्ताराच्या दृष्टीने जिल्हातील प्रमुख कार्यकर्तेचा मेळावा आळंदीतील साईराज मंगल कार्यालयात पार पडला, यावेळी अँड अनंराव काळे यांनी पुणे जिल्हात व आळंशी शहरात केलेल्या सामाजिक कामाची दखल राज्य मंत्री मा.बच्चुभाऊ कडू यांनी घेतली व त्यानी निवडक कार्यकर्ते च्या मेळाव्यात काळे यांना व जिल्हा अध्यक्ष पदीचे निवडीचे पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

अध्यक्ष मा. श्री. अँड. अनंतरावजी काळे यांचा प्रहार पुणे जिल्हा च्या वतीने प्रहार जिल्हा संघटक मा. नीरजभाऊ कडू, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष व जिल्हा प्रहारचे मार्गदर्शक मा. श्री. नंदकिशोरजी जगदाळे सर, पुणे शहर अध्यक्ष मा. श्री. सुनिल गोरे व सर्व तालुका, शहर, विविध आघाडी चे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार  आळंदी येथे साईराज मंगल कार्यालय येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासकीय नियम पाळून करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अँड काळे  यांनी मा. बच्चू भाऊ कडू साहेब व प्रहार कार्याध्यक्ष मा.बल्लूभाऊ जवजांळ, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख मा अजयजी महाराज बारस्कर यांच्या मार्गदर्शनाने व कार्य पद्धतीनुसार प्रहारचे कार्य पुणे जिल्हा प्रमुख संघटक नीरज भाऊ कडू यांच्या बरोबरीने जिल्हाभर मोठया प्रमाणात गाव तिथे शाखा बांधणी करुन समाजकारण करण्यासाठी व जास्तीत जास्त स्थानिक पातळीवर मा. बच्चू भाऊ कडू साहेबांच्या विचाराणे कार्य करेल व जास्त प्रमाणात लोकप्रतीनिधी निवडणून आणण्याचा काळे यांनी मनोदय व्यक्त केला.
यावेळी पुणे जिल्ह्यातील प्रहार चे महेश भाऊ कणकुरे , रोहित भाऊ भोसले ,रामभाऊ कुकडे ,संदीप  जाधव , पुनमताई ताई तावरे मीनाताई धोत्रे , कमिनीताई ताकवले ,विद्या ताई ठिपसे ,रूपा ताई जाधव शिवराज काळभोर , विजय भाऊ तापकीर , बापूसाहेब नवले , संतोष भाऊ कबाडी , जितेंद्र भालेराव , श्री सुनील जाधव , रमेश शितोळे ,संजय राऊत , इतर प्रहार चे सर्व शहर, तालुका, विविध आघाडी चे अध्यक्ष सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *