पिंपरी-चिंचवड : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून “अति उत्कृष्ट पोलीस सेवा पदक” मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री. गौरव कुंभार यांचा फुगेवाडी–दापोडी शिवसेना शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मा. गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांच्या हस्ते श्री. गौरव कुंभार यांचा सन्मान करण्यात आला.
पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री. गौरव कुंभार यांना मिळालेला हा सन्मान फुगेवाडी–दापोडी परिसरासाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. त्यांच्या पुढील सेवेसाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उपनेते श्री. इरफान सय्यद, भाजप नेते श्री. सदगुरू कदम, शिवसेना विभागप्रमुख श्री. प्रमोद गायकवाड, विभागप्रमुख श्री. अविनाश जाधव, उपविभागप्रमुख श्री. योगेश बहिरट, उपविभाग प्रमुख श्री. राहुल जाधव,प्रभागप्रमुख श्री. फिरोज शेख, कोकण महासंघाचे अध्यक्ष श्री. गजानन मोरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी युवासेना शहर संघटक श्री. निलेश हाके यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *