पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. उषा संजोग वाघेरे यांनी “माझा प्रभाग, माझं व्हिजन” या संकल्पनेतून विकासाभिमुख प्रचाराला वेग दिला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा सशक्त आराखडा त्यांनी मांडला आहे.
रस्ते, गटारी, स्ट्रीटलाइट, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी सेवा दर्जेदार व वेळेत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असून, प्रभागामध्ये स्वच्छता पथक सक्रिय ठेवणे, रस्त्यांची देखभाल नियमित करणे आणि नागरिकांसाठी सुरक्षित व प्रकाशमान परिसर निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभागातील पिंपरी गाव, केशव नगर, मिलिंद नगर आणि जिजामाता रुग्णालय परिसरात नागरिकांशी थेट संवाद साधताना विकासकामांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत नागरिकांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला आहे. मतदारांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून सौ. उषा संजोग वाघेरे यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत आहे.
