पिंपरी दि. 4( प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांना सोसायट्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे,निकिता कदम, यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे. प्रचार फेरी, पदयात्रा,घरोघरी संपर्क, सोसायटीमध्ये छोट्या मोठ्या बैठका याद्वारे संदीप वाघेरे यांच्यासह संपूर्ण पॅनेलने अवघा मतदारसंघ पिंजून काढला आहे. पिंपरी गावातील यशदा फ्लोरेन्जा सोसायटी, सुखवानी सोसायटी, सुखवानी कॅस्टल, सुखवानी सिटी मधील सोसायटीधारकांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचे जोरदार स्वागत केले व पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी पूर्व पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, राकेश मोरे, राजेंद्र वाघेरे,नितीन गव्हाणे, शेखर अहिरराव,दत्ता बोराडे , ईश्वर कुदळे, श्रीचंद नागराणी, मोटवानी सर आदी उपस्थित होते.
यावेळी संदीप वाघेरे म्हणाले की, यावेळी मतदारांमध्ये परिवर्तनाची लाट आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नुकताच पिंपरी चिंचवडचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना ‘सन 2017 नंतर महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपची राक्षसी भुक मला पाहवत नाही. हप्तेखोरी, टेंडर मध्ये रिंग सुरू आहे, लुटारूंच्या टोळीने पालिकेला कर्जबाजारी केले आहे. भाजपाला सत्तेची मस्ती माज आणि नशा चढली आहे. शहरातील काहींच्या प्रॉपर्टी एकदम कशा वाढल्या ते जनतेने पहावे. भाजपची मस्ती या निवडणुकीत उतरावावी असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले होते.यामुळे मतदारांमध्ये यावेळी भाकरी फिरवण्याची भावना आहे. आपण नगरसेवक या नात्याने पिंपरी गाव प्रभागात केलेली मोठ्या प्रमाणावरील विकास कामे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंबीर नेतृत्व यामुळे प्रभाग क्रमांक 21 मधून राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनल विजयी होईल असा विश्वास माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *