पिंपरी चिंचवड:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे हे दरवेळेला भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांच्याशी हात मिळवणी करून समोरासमोर निवडणूक लढविण्याचे टाळतात व दुसऱ्या उमेदवारांचे बळी देतात.त्यामुळे यावेळी तरी नाना काटे व बापू काटे एकमेकांसमोर निवडणूक लढलेतर यांच्यात होणार काटेकी टक्कर?
पिंपळे सौदागर रहाटणी अशा या प्रभाग 28 मधून नाना काटे व बापू काटे हे दरवेळेला निवडणूक लढवतात.मात्र नाना काटे हे सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवतात व बापू काटे मागास प्रवर्गातून (ओबीसीतून) निवडणूक लढवतात.त्यामुळे ते समोरासमोर येण्याचे टाळतात.त्या दोघांची एक प्रकारे छुपी युती असते अशी चर्चा प्रभागातील नागरिक करतात.
2007 च्या महापालिका निवडणुकीत नाना काटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते व शत्रुघ्न बापू काटे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते.त्यावेळी सिंगल वॉर्ड होता त्यामुळे त्या दोघांकडे पर्याय नव्हता.मात्र त्यावेळी काँग्रेस ही संपण्याच्या स्थितीत होती म्हणून नाना काटे हे त्या निवडणुकीत विजयी झाले व बापू काटे यांचा पराभव झाला.मात्र आता बापू काटे हे भाजपचे उमेदवार आहेत आणि पिंपळे सौदागर व रहाटणीचा काही भाग हा मोठमोठ्या सोसायट्यांचा प्रभाग आहे. त्यामुळे यावेळेस बापू काटे यांचे पारडे जड आहे.कारण सोसायटी परिसरात कमळ जास्त प्रमाणात चालते आणि बापू काटे यांच्याकडे आज कमळ आहे.
मराठा समाज हा मुळ चा कुणबी शेतकरी असल्याने बहुतेक मराठा समाजाच्या उमेदवारांकडे कुणबीचे दाखले आहेत व बापू काटे हे कुणबी दाखल्यावर मागास वर्गातून म्हणजेच ओबीसीतून दर वेळेला नगरसेवक म्हणून निवडणूक लढवतात.नाना काटे व बापू काटे समोरासमोर येऊ नये म्हणून नाना काटे कुणबी दाखला काढत नाहीत व समोरासमोर निवडणूक लढवण्याचे टाळतात.
मात्र आता पक्ष श्रेष्ठीने सांगितले तर बापू काटे हे नाना काटे यांच्यासमोर सर्वसाधारण गटातून निवडणूक लढू शकतात व आपल्या 2007 च्या पराभवाचा वचपा काढू शकतात.
पिंपळे सौदागर रहाटणी या प्रभागातून यावेळी तरी नाना काटे आणि बापू काटे समोरासमोर लढण्याची हिंमत दाखवणार का ? हे येणारा काळच सांगू शकेल अशी चर्चा शहरात रंगलेली पहायला मिळतेय.
