पत्रकार संघाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
पिंपरी (प्रतिनिधी) –पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा नुकताच गौरव करण्यात आला. पत्रकार संघाच्या आयोजित अभिनव उपक्रमासाठी शहराच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात महापालिका शहर अभियंता श्री.मकरंद निकम, मुख्य अभियंता श्री संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेतील कै.भा वि कांबळे पत्रकार कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी सहशहर अभियंता देवान्ना गटटूवार, बापूसाहेब गायकवाड, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे प्रमुख अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते इत्यादी उपस्थित होते.पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यामध्ये सहशहर अभियंता सुनील उर्फ दादा भागलानी,माणिक चव्हाण, नगरसचिव श्री मुकेश कोळप, स्थापत्य कार्यकारी अभियंता हेमंत देसाई, उपमुख्य लेखाधिकारी व वित्त अधिकारी अरुण सुपे, लेखाधिकारी गायकवाड यांचा समावेश होता.उपस्थित सर्व अधिकारी आणि सत्कार मूर्तिना संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा देऊन अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन
पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी आरोग्य चिकित्सा शिबीर,५१ हजार रोख रक्कमेसह पत्रकार जीवन गौरव पुरस्कार, शहरातील विविध क्षेत्रातील उतुंग कार्य करणाऱ्या १० मान्यवरांचा pcmc top 10 या पुरस्कार देऊन सन्मान, दिवाळी फराळ, पत्रकार दिन समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जातात.पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ ही संघटना सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवते. पत्रकार, सामाजिक प्रश्न, शिक्षण, आरोग्य आणि प्रशासन यामध्ये सकारात्मक संवाद घडवण्यासाठी संघटनाकडून नियमित उपक्रम हाती घेतले जातात.भविष्यातही असेच उपक्रम राबविण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेमध्ये पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे,विनय लोंढे, रेहान सय्यद, प्रवीण शिर्के, मुकेश जाधव, दिलीप देहाडे, देवा भालके,संतोष जराड,गणेश शिंदे,जितेंद्र गवळी, शबनम सय्यद, दिनेश दुधाळे, बद्रीनारायण घुले, राम गायकवाड, मुझ्झफर इनामदार इत्यादी पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले. यावेळी महापालिकेतील विविध विभागांतील अधिकारी सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी केले तर प्रस्तावना डिजिटल मीडिया पत्रकार संघांचे उपाध्यक्ष शिवाजी घोडे यांनी केले.