मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगरात भव्य कार्यक्रम – आरोग्यावरील मार्गदर्शनासह ९४१ घरांच्या पुनर्विकासाची टेंडर प्रकिया जाहीर

पुनर्विकासाची नांदी – यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

 

पिंपरी/ संत तुकाराम नगर | प्रतिनिधी | दिनांक २४ जुलै २०२५ :– राष्ट्रीय श्रमिक आघाडी (महाराष्ट्र राज्य) अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांच्या संयोजनाखाली तसेच भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्नजी काटे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (दि.२२ जुलै) आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्यावरील मार्गदर्शनासह ९४१ घरांच्या पुनर्विकासाची टेंडर प्रकिया जाहीर करण्यात आली.

या कार्यक्रमाला खासदार श्री अमरजी साबळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री सदाशिवराव खाडे, मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, दिनेश पाटील, दीपक पाटील, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मंचावरून जाहीरपणे वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्यांनी दोन्ही नेत्यांचे महाराष्ट्राच्या विकासातले योगदान अधोरेखित करत, त्यांच्या नेतृत्वामुळे राज्यात विविध पातळ्यांवर सकारात्मक बदल घडून आल्याचे नमूद केले. भोसले यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना “लोकनेते” आणि “प्रेरणादायी नेतृत्व” म्हणून गौरविले.त्यांनी असेही म्हटले की, “राज्याच्या प्रगतीसाठी ज्या प्रकारे या दोन्ही नेत्यांनी समन्वय साधून काम केले आहे, ते खर्‍या अर्थाने अनुकरणीय आहे. आम्हा सर्व नागरिकांचे हित लक्षात घेतले जात आहे ही मोठी बाब आहे. येणाऱ्या काळात कामगार हिताचे निर्णय दोघेही घेतील अश्या अपेक्षा व्यक्त केल्या.”अखेर त्यांनी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमामध्ये “आरोग्यावर बोलू काही” या विषयावर विख्यात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांनी मोठ्या स्क्रीनवरून आरोग्य, आहार आणि व्यायामाबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांधेदुखी, मणक्याचे आजार, हाडांची कमकुवतता यावर उपाय सुचवले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संत तुकाराम नगर गृहनिर्माण सहकारी गृह रचना संस्था मर्यादित या सोसायटीच्या ९४१ घरांच्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पाचे टेंडर जाहीर करण्यात आले. अध्यक्ष श्री यशवंतभाऊ भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सर्व सोयी-सुविधांसह नियोजित व्हिडीओ दाखवण्यात आला.या व्हिडिओची संकल्पना देखील यशवंतभाऊ भोसले यांची होती.प्रकल्पाचे टेंडर श्री पुष्कराज भांबरे (आर्किटेक्ट) यांनी वाचून दाखवले. सर्व सभासदांनी बहुमताने या टेंडरला संमती दिली. मंचावर सोसायटीचे ४१ कार्यकारिणी सदस्यही उपस्थित होते.संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना यशवंतभाऊ भोसले यांनी तर शंकरराव शितोळे यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *