पिंपरी :- महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाचे भांडारपाल बुधा ढवळा दाभाडे यांनी महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देतो म्हणून १२ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे आली होती. त्याची दखल घेऊन आयुक्तांनी भांडारपाल दाभाडे यांना नोटीस बजावली असून, तीन दिवसांत खुलासा मागितला आहे.
भांडारपाल दाभाडे यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार निगार दस्तगीर आतार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. वारंवार विचारणा करूनही त्यांनी नोकरी लावली नाही. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.