पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय आंदोलन…
पुणे :- 17 जून 2025 रोजी सांगली (कुपवाड) येथील मशाल मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना उद्देशून अत्यंत चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे समस्त ख्रिस्ती समाजात अशांतताचे वातावरण पसरले आहे.
अशा चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे समस्त ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात 1.आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. 2.त्यांच्या आमदार पदाची रद्दबातल कार्यवाही तात्काळ व्हावी. 3.ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणाची CID चौकशी व्हावी. 4.समाजात भीती निर्माण करणाऱ्या वक्तव्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
तसेच गोपीचंद पडळकर यांना जो कोणी काळं फासेल व कानशिलात लगावेल त्यांना १ लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर केले.
गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर पुढील भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत गुन्हे लागू करावेत. कलम 192–प्रक्षोभक भाषण, दंगा घडवणे, कलम 198 – कायद्याची लोकसेवकाने अवहेलना, कलम 111– गुन्हेगारीस प्रवृत्त करणे, कलम 302–खूनासाठी प्रोत्साहन अशा प्रकारचे गुन्हे दाखल करावेत.
समस्त ख्रिस्ती बांधव यांनी शांततामय मार्गाने संविधानाच्या चौकटीत आंदोलन केले. यावेळी फा.रॉक अल्फान्सो, राजेश केळकर, बिशप आल्फ्रेड तिवडे, नरेंद्र गायकवाड, विल्सन भोसले, अतुल नाडे, सतीश पटेकर, नाथान हुंबरे, प्रविण पाटोळे, रॉबिन रायचूर, जिजॉय वर्गीस, रि.कर्नल निलेश साळवी यांनी मार्गदर्शन केले.