पिंपरी – साकेत सोशल फाउंडेशन, बोपोडी, नेहमीच आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रसिद्ध आहे. चित्रकला, विविध गुण प्रदर्शन, निबंध, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा हे फाउंडेशन नेहमी घेत असते. यावेळी हि साकेत सोशल फाउंडेशन ने प्रजासत्ताक दिनाची शहात्तरी तथा भारतीय साविंधनाची पंचाहत्तरी प्रीतीयार्थ सायकल स्पर्धेचे आयोजेन केले होते. या स्पर्धे मध्ये एकूण ५३ सायकलिस्ट सहभागी झाले होते. बोपोडी मेट्रो स्टेशन ते देहूरोड आणि रिटर्न बोपोडी मेट्रो स्टेशन अशा ५० कि. मी. मार्गावर हि स्पर्धा झाली. स्पर्धेतील पहिल्या ५ विजेत्यांना फॉऊंडेशन तर्फे गौरविण्यात आले. ओंकार खेडकर या भुकूमच्या सुपुत्राने प्रथम क्रमांक पटकाविला, त्याचबरोबर पुणे गावठाण परिसरातील ओंकार खाचे यांनी दुसरा, तर उमेश बंजारा यांनी तृतीय, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सतीश सावंत यांनी चतुर्थ आणि उमेश अहलुवालिया यांनी पाचवा क्रमांक पटकावला. पुरस्कार वितरण खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी मा. दिलीप फुलपगारे तसेच खडकी शिक्षण संस्थेचे सचिव, मा. आनंद छाजेड आणि वनवर्धिनी फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय ढोणे यांच्या उपस्थितीत पार पडला.

हि स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यामागे साकेत सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री. शंकर कचरे आणि सचिव, श्री. रोहित सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले, तर साकेत सोशल फाउंडेशनचे संपर्क प्रमुख, श्री. भुषणजी साळवे, ऍड. मिलींदजी शेलार, श्री. संतोषजी यादव, श्री. राहुलजी वाघमारे, श्री.अतुलजी गायकवाड, श्री. सनी परमार, श्री. शाहरुख शेख आणि प्रा. डॉ. विशाल गायकवाड, यांच्या देखरेखीत संपन्न झाला. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते पँथर वसंतदादा साळवे यांनी विशेष मागदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *