पिंपरी – संत तुकाराम नगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा 76 वा ध्वजारोहण  ह.भ.प शामराव गायकवाड व मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आन्ना जोगदंड  यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोगदंड म्हणाले की ,सर्व भारतीय नागरिकांनी आपण सर्व जण प्रथम भारतीय आहोत. सर्वांनी एकोप्याने गुण्या गोविंदाने राहून जात,धर्म, वंश याचा भेदभाव न करता आपण सर्वजण एकाच भारतमातेचे भुमीपुत्र आहोत याची सर्वांनी जाण ठेवावी. आप आपसातील मनभेद,व मनभेद बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र आले पाहिजे असे मत जोगदंड मांडले. तरुणाई मोबाईलच्या अधिन झाली आहे. वाचनसंस्कृती लुप्त होत चालली अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.. यावेळी प्रमुख पाहुणे ह.भ.प.शामराव गायकवाड म्हणाले की, प्रत्येकाने संतांचे संस्कार आपापल्या मुलांमध्ये रुजवले पाहिजेत, महिलांनी जर तुळशीला प्रदक्षिणा घातली तर काशीला गेल्याचे पुण्य मिळते .देव खरा आई वडीलामध्येच आहे, त्याची सेवा करा कुठे ही जाण्याची गरज नाही आणि महिलांनी पतीलाच परमेश्वर मानले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला.

केंद्र संचालक अनिल कारळे यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध कामगार कुटुंबासाठी,कामगार पाल्यासाठी असणाऱ्या योजनांची माहिती दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त महीलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती 20 महिलांनी सहभाग नोंदवला त्यातील समृद्धी क्षीरसागर, आकांक्षा मिरजकर सुरेखा चंद्रकांरी यांना प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे रोग बक्षीस अण्णा जोगदंड व शामराव गायकवाड महाराज यांच्या हस्ते देण्यात आले.

मानवी हक्क म्हणजे काय? या पुस्तकाचे उपस्थित गुणवंतांना वाटप करण्यात आले. यावेळी 80 वर्षाच्या सुशीला जाधव व कुसुम मोरे यांचाही मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गुणवंत कामगार जेष्ट साहित्यिक सुरेश कंक, कामगार प्रतिनिधी किरण देशमुख, गुणवंत कामगार संगिता जोगदंड, शिंदे सुदाम,मानवी मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या महिला अध्यक्षा संजना करंजावणे,सुरेखा मोरे, काळुराम लांडगे,प्रकाश घोरपडे, हभप यादव तळले ,चंद्रकांत लवाटे, शहाजी दौंडकर श्रीराम गवसकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते कुसुम मोरे, संगीता क्षीरसागर ,सुशीला जाधव ,परविन तांबोळी, माधुरी अलिबागकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केंद्र संचालक अनिल कारळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *