मुंबई :- राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदांतील आरोग्य संवर्गामधील सर्व जाती-प्रवर्गातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा.
राज्य सरकारने दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयास मा. उच्च न्यायालय, मुंबईचे औरंगाबाद खंडपीठामध्ये स्थगिती मिळाल्यामुळे लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार वारस नियुक्तीबाबतची प्रकरणे गेली अनेक वर्षांपासुन प्रलंबित होते. सदर प्रकरणाबाबत राज्य सरकारने सकारत्मक निर्णय घेतलेला असताना देखील स्थगिती आदेशामुळे सदरची प्रकरणे प्रलंबित होती.
आज दिनांक ०८/०१/२०२५ रोजी मा. उच्च न्यायालय, मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठामार्फत सदर प्रकरणांवरील स्थगिती उठविण्यात आली असुन दिनांक २४ फेब्रुवारी, २०२४ चा शासन निर्णय पुर्वीप्रमाणेच सर्व कर्मचाऱ्यांना लागु झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमधील सर्व जाती-संवर्गातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा वारस नेमणुकीचा प्रश्न मार्गी लागलेला असुन सदर कामामध्ये महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका-नगरपरिषद, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन व अनेक कर्मचाऱ्यांच्यावतीने देखील अनेक वकील सदरच्या प्रकरणामध्ये देण्यात आले होते. वारस नेमणुकीपासुन वंचित राहिलेले अनेक कर्मचारी व त्यांचे वारस आज औरंगाबाद येथे उपस्थित होते.
सदर प्रसंगी महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका-नगरपरिषद, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे, कार्याध्यक्ष श्री. अशोक जाधव, प्रमुख सरचिटणीस श्री. गणेश शिंगे, प्रवक्ता श्री. गौतम खरात, ऍड. सुरेश ठाकुर, श्री. संतोष पवार, श्री. अंकुश गायकवाड श्रीमती. चारुशिला जोशी, श्री. नितीन समगीर, श्री. सनी कदम आदी उपस्थित होते.