राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी व घटक पक्षाचे जोरदार शक्ती प्रदर्शन
आकुर्डी – राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी या जयघोषात आकुर्डी परिसरातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचारासाठी जनसागर लोटला होता. या प्रचंड जनसागरामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही जवळपास एकतर्फी होणार व महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत प्रचंड बहुमताने विजयी होणार याच्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
पिंपरी विधानसभा निवडणूक निमित्ताने आकुर्डी दत्तवाडी, विठ्ठलवाडी, क्रांतीनगर, श्रीकृष्ण नगर, एकतानागर, पंचारानगर, गुरुदेवनगर, आकुर्डी गावठाण या भागात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यानी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचारार्थ आकुर्डी परिसरा गाठी भेटी व भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला लोटलेली अभुतपुर्व गर्दी पाहता या प्रभागात शिलवंत यांनी जोरदार आघाडी घेतल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
शिलवंत यांच्या प्रचारार्थ आकुर्डी पहिल्या सत्रात येथे सकाळ पासून गाठी भेटी घेण्यास सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी या ठिकाणी गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे चिन्ह असलेले उपरणे, हातामध्ये तुतारी चिन्ह असलेले फलक, उमेदवारांचे छायाचित्र असलेले फलक घेऊन कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करून वातावरण ढवळून काढत होते. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. ताशाच्या तडतडाटाने या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे शिरलेले पाहायला मिळाले. दुपारी 12 वाजता आकुर्डी येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिर येथे श्रीफळ वाहून भव्य पद यात्रेला सुरुवात करण्यात आली .महाविकास आघाडीचे उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांच्या सह, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक गिरीश कुटे , राष्ट्रवादी काँग्रेसचे इखलास सय्यद, तौहीद जावेद शेख, संदीप चव्हाण, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष राजेंद्र कदम, सागर लक्षरे, साहूल हमीद शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप पानसरे टाटा मोटर्सचे युनियन माजी कार्याध्यक्ष अशोक माने , पश्चिम महाराष्ट्र युवा नेते अशोक पाटील, अमोल निकम, शिवसेना उपशहरप्रमूख, वैभवीताई घोडके, शहर समन्वयक पार्थ गुरव, विभागप्रमुख विकास भिसे, प्रदीप महाजन, भाविक देशमुख, जिब्राईल शेख, सुनील मोरे, सुरज मोरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अमीन शेख, अभिजित सोनके, ऋषिकेश घोरपडे, आपुलकी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा कुऱ्हाडे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्षा मीनाताई जावळे, चेतन बेंद्रे, चंद्रमानी जावळे, सतीश सिलम, काँग्रेसचे राहुल शिंपले, वहाब शेख, सुनीता पवार, सर्व पक्षांचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळच्या सत्रात दत्तवाडी, विठ्ठलवाडी, क्रांतीनगर, श्रीकृष्ण नगर,लाल बहादुर शास्त्री नगर, सह्याद्री कॉलनी, साई दर्शन नगर, टेलको कपूर सोसायटी, एकतानागर तर संध्याकाळ च्या सत्रात आकुर्डी गावठाण, पंचतारानगर,गुरुदेव नगर, गंगानागर, या परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन करून पद यात्रा काढण्यात आली. या दरम्यान ठिकठिकाणी महिलांनी या उमेदवारांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. आजच्या दौऱ्यातून झालेल्या शक्ती प्रदर्शनामुळे तसेच नियोजनबद्ध प्रचारामुळे या प्रभागात सुलक्षणा शिलवंत धर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
आकुर्डी भागात सुरुवातीपासूनच प्रचाराचे सर्व पर्याय अमलात आणले आहेत. विशेषतः सोशल मीडिया द्वारे जोरदार प्रचार सुरु आहे. शिवाय मतदारांच्या गाठीभेटी, कोपरा सभा, एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून आपले व्हिजन ध्वनिचित्र फीत दाखवून वातावरण ढवळून काढले जात आहे. या सर्व जोरदार प्रचारामुळे या प्रभागात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची हवा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा नियोजनबद्ध प्रचार आणि मतदाराचा वाढता पाठिंबा पाहता विरोधी पक्षाच्या गोटात अनिश्चिततेचे वातावरण पसरले असल्याची चर्चा आहे.