सामाजिक जाण असणाऱ्या नेत्यासोबत जाण्याचा निर्धार…

वाकड, ता. ७ : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी नगरसेवक म्हणून जनहितासाठी भरीव योगदान देत असंख्य विकासकामे केल्याची दखल घेत रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने (डांगळे गट) जाहीर पाठिंबा दिला.
वाकड येथील प्रचार शुभारंभ सभेत पक्षाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अर्जुनराव डांगळे, प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष माऊली उर्फ किसन भोसले यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष संग्राम रोहोम, महिला संघटिका गायत्री भोसले, महादेव सरवदे किरण काळे, अनिल पवार, अल्पसंख्याक आघाडीचे शेख मामू, श्रीमंत भोसले उपस्थित होते.
रिपब्लिकन जनशक्ती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर गेली बारा वर्षे युतीत असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. राहुल कलाटे हे सर्व सामान्यांच्या प्रश्नावर उत्तम काम करणारे व्यक्तिमत्व असून, पिंपरी चिंचवडमध्ये नगरसेवक असताना जनतेला केंद्रस्थानी ठेवून  अनेक विकासकामे करत सर्व सामान्यांच्या प्रश्नांना त्यांनी योग्य न्याय दिलेला आहे.

प्रतिक्रिया
मी समाजकारण आणि राजकारणाची सुरुवात केल्यापासून सर्व सामान्य जनताच माझ्या केंद्रस्थानी आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी मी कायम योगदान देत आलोय. यापुढेही माझ्या या कार्यात खंड पडणार नाही. माझ्या कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन जनशक्ती पक्षाने दिलेला पाठिंबा व टाकलेला विश्वास मी सार्थ ठरविणार आहे.
– राहुल कलाटे, उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांचा निश्चितपणे विजय होणार असून या विजया मागे रिपब्लिकन शक्ती आपला महत्त्वाचा खारीचा वाटा उचलणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून वीजयी  झाल्यानंतर ते सामान्य माणसाच्या प्रश्नाला निश्चितपणे न्याय देतील. सर्व जाती-धर्माच्या घटकांना बरोबर घेऊन विकास करतील याची आम्हाला खात्री आहे.
–  माऊली उर्फ किसन भोसले
 शहराध्यक्ष रिपब्लिकन जनशक्ती पक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *