भोसरीत भाजपाला गळती ;आमदारांना धक्का 
– विद्यमान आमदारांच्या कार्यशैलीविरोधात भोसरीकरांनी दंड थोपटले
– पदाधिकारी, माजी नगरसेवकांच्या गळतीचे ”रिफ्लेक्शन’ निवडणुक निकालात दिसेल 
भोसरी 6 नोव्हेंबर:
भोसरीतील माजी नगरसेविका सारिका संतोष लांडगे व संतोष लांडगे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सारिका लांडगे यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा भाजप आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
भोसरीचा गड या पंचवार्षिकमध्ये ढासळताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी भाजपचे लक्ष्मण सस्ते, भिमाबाई फुगे आणि आता सारिका लांडगे यांच्या माध्यमातून भाजपला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. सारिका संतोष लांडगे यांनी बुधवारी यमुनानगर निगडी येथे महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला.
सहा महिन्यापूर्वी भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे चित्र महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभेचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी पूर्णतः पालटून टाकले आहे. एकतर्फी वाटणारी भोसरी विधानसभेची निवडणूक अजित गव्हाणे यांनी अक्षरशः रेस मध्ये आणून ठेवली आहे. पदयात्रा, रॅली, भेटीगाठी यामध्ये अजित गव्हाणे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना धडकी भरलेली असताना पक्षाला लागलेली गळती एक प्रकारे विद्यमान आमदारांना मोठा धक्का मानला जात आहे.
भाजप नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असलेले इनकमिंग व त्याचे “रिफ्लेक्शन” येत्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात नक्कीच पाहायला मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीच्या मेळाव्यात आज व्यक्त करण्यात आला.
………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *