पिंपरी :- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुलक्षणा शिलवंत यांनी आज दापोडी ते निगडी दरम्यान आपली प्रचार रॅली आयोजित केली होती. तुफान प्रतिसाद असलेल्या या रॅलीने अखंड पिंपरी विधानसभा मतदारसंघात झंझावात निर्माण केला. ही रॅली पाहून मतदारांनी पिंपरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर या हमखास निवडून येणार त्यांनी पिंपरीचे रण मारले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आज सकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सुलक्षणा शिलवंत धर यांनी सर्वप्रथम त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून दापोडी येथून प्रचार रॅलीस प्रारंभ केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते माता-भगिनी ज्येष्ठ नागरिक तरुण असे सर्व वयोगटातील कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.
पिंपरी विधानसभा मतदार संघात पहिली महिला आमदार होण्याचा बहुमान डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना प्राप्त होत असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवले. सुलक्षणा शिलवंत यांचा विजय निश्चित झाला असल्याचा विश्वास या रॅलीने शहराला दाखवून दिला.
डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या माध्यमातून नवा इतिहास इतिहास घडविण्याची संधी मतदारांना मिळाली असून हा इतिहास आपण घडवून दाखवणारच असा विश्वासही अनेक मतदारांनी व्यक्त केला.
यावेळी आपण पैशाची नाही तर कामाचे पॉवर दाखवणार आहोत, पिंपरीत विकासाचं परिवर्तन घडवणार आहोत. अशी प्रतिक्रिया या रॅली नंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी व्यक्त केली.
सुलक्षणा शिलवंत यांची ही प्रचार फेरी आज फिरंगाई देवी मंदिर दापोडी येथून सुरु झाली. पुढे विनियार्ड चर्च येथे ख्रिश्चन बांधवांची भेट घेण्यात आली. ख्रिश्चन बांधवांनी सुलक्षणा शिलवंत यांचे जंगी स्वागत केले. पुढे रॅली फुगेवाडी मार्गे कासारवाडी, वल्लभनगर , संत तुकाराम नगर मार्गे शाहूनगर, संभाजीनगर मध्ये पोहोचली पुढे शाहूनगर, संभाजीनगर करत निगडी, निगडी प्राधिकरण, आकुर्डी गावठाण या मार्गे रॅली गेली या रॅलीमध्ये प्रमुख उपस्थिती उमेदवार सुलक्षणा शीलवंत धर, माजी मंत्री व शिवसेना नेते सचिन अहिर माजी आमदार व शिवसेनेचे संपर्कप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, शिवसेनेचे संजोग वाघेरे पाटील, पिंपरी चिंचवड शहर शिवसेनाप्रमुख सचिन भोसले, युवा सेना प्रमुख चेतन पवार, गणेश दातीर पाटील, संदीप चव्हाण, वैभवी घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी उमेदवार सुलक्षणा शिलवंत, हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शरद रावजी पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, जयंत पाटील आदींची छायाचित्रे हातात घेऊन राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी या घोषणा देत संपूर्ण परिसरात झंझावात निर्माण केला होता.