– ‘आम्हाला खेळ बदलता येतो’, एक हेच बळ’ च्या घोषणांनी लक्ष वेधले
– यंदा खेळ बदलणार म्हणत भोसरीकरांनी दिली परिवर्तनाची हाक
भोसरी 2 नोव्हेंबर:
भोसरी गावठाणा मध्ये काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अवघे भोसरीकर एकवटले. “यंदा खेळ बदलणार आणि एकी हेच बळ “अशा घोषणांनी भोसरीकरांनी निवडणुकीच्या प्रचाराचे लक्ष वेधले. प्रचंड जनसमुदाय आणि एकवटलेले भोसरीकर यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अजित गव्हाणे यांनी चांगलाच रंग भरला आहे.
महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना नुकतेच फुगे कुटुंबीयांकडून बळ मिळाले आहे. याचीच परिणीती गव्हाणे यांच्या प्रचारानिमित्त काढलेल्या रॅलीमध्ये दिसून आली. भोसरी गावठाणा मध्ये काढलेल्या रॅलीमध्ये माजी नगरसेविका भीमाबाई फुगे, सम्राट फुगे यांनी पुढाकार घेतला. रॅलीमध्ये अजित गव्हाणे यांना गावठाणातील युवा कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ दिसून आले. यावेळी गावातील ज्येष्ठ पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
यावेळी गव्हाणे यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले. नागरिकांच्या गाठीभेटी घेत असताना महिला भगिनींनी औक्षण करत गव्हाणे यांना ‘विजयाचा तिलक’ लावला. युवा कार्यकर्त्यांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहत गव्हाणे यांना विजयाचा विश्वास दिला. परिसरातील विविध मंदिरांमध्ये देवतांचे दर्शन घेत गव्हाणे यांनी आशीर्वाद देखील घेतले.
………..
लक्षवेधक घोषणा
भोसरी गावठाणामधून प्रचार रॅली जात असताना “तुम्ही खेळ सुरू केला असला तरी आम्हाला खेळ बदलता येतो”अशा घोषणांनी लक्ष वेधून घेतले. एकी हेच बळ असे म्हणत तमाम भोसरीकरांनी यंदा परिवर्तनाचा नारा दिला आहे. गव्हाणे यांना मिळत असलेला युवकांचा पाठिंबा यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाची नांदी ठरणार आहे.
…………
ज्येष्ठांचे आशीर्वाद, युवकांची साथ आणि माय माऊलींचा पाठिंबा या बळावर यंदा भोसरीकरांच्या साक्षीने परिवर्तन अटळ आहे. दहा वर्षातील खदखद बाहेर पडत असून या परिवर्तनाचा मी केवळ एक चेहरा आहे. ही माझी प्रांजळ कबुली आहे. भोसरीकर ठरवतात ते नक्की करतात हा इतिहास आहे.
-अजित गव्हाणे
………….