पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झाली. दुसऱ्या यादीत 22 उमेदवारामध्ये पिंपरीतून सुलक्षणा शिलवंत धर यांना तिकीट देण्यात आले आहे. 2019 मध्येही शरद पवार यांनी सुलक्षणा धर यांना राष्ट्रवादीचे संयुक्त तिकीट दिले होते. पण पडद्यामागे काही चाणक्य राजकारण्यांनी रात्रभर अजित पवारांची भेट घेतली, सुलक्षणा यांचे तिकीट रद्द करून अण्णा बनसोडे यांचे तिकीट आणले आणि सकाळी अकरा वाजता जाऊन उमेदवारी दाखल केली.
आता पिंपरीत राष्ट्रवादीचे दोन उमेदवार आमनेसामने निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार गटाचे सुलक्षणा शिलवंत यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यात लढत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरीबाबत सस्पेंस होता. यासाठी सीमा सावळे यांनी काही माजी नगरसेवक शरद पवार यांचीही भेट घेतली. मात्र पवार साहेबांनी विश्वासू कुटुंबातील कन्या सुलक्षणा शिलवंत धर यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला. सुलक्षणा यांची शिफारस माजी खासदार श्रीनिवास पाटील व शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केल्याची चर्चा आहे.