पिंपरी- पिंपरी भाजी मंडई परिसरात गेली ३५ वर्षे सावित्रीबाई फुले भाजी व्यवसाय मार्गदर्शक संघ व त्यांचे सदस्य भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.सर्व भाजी विक्रेते हे परवानाधारक असून त्यांनी महानगरपालिका व स्थानिक राजकीय नेत्यांना वेळोवेळी निवारा मिळण्याबाबत विनंती करत होते.आमदार अण्णा बनसोडे यांना ही बाब लक्षात येताच भाजी मंडई मधील ३०० परवाना धारक भाजी विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात पत्रा शेड गाळे बांधून दिले.त्यामुळे एवढ्या मोठ्या स्वरूपात काम झाल्याने ,पिंपरी भाजी मंडई मधील प्रत्येक गाळ्यावरील आमदार अण्णा बनसोडे यांचा फोटो पाहून व शहरात लागलेल्या बॅनर मुळे आमदार अण्णा बनसोडे यांच्या राजकीय विरोधकांना पोटदुखी होणार नाही हे नवलच.त्यातील काही इच्छुक उमेदवारांनी कामाची उपयोगिता न पाहता त्याबाबत तक्रारी केल्या तर काही उलट सुलट बातम्या प्रसारित केल्या मात्र ह्या सगळ्या विरोधाला न जुमानता आमदार अण्णा बनसोडे यांनी आज या 300 गाळ्याचे अगदी थाटात व जोरदार उदघाटन केले.

उदघाटन प्रसंगी आमच्या प्रतिनिधींनी आमदार अण्णा बनसोडे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरचे काम हे लोकहिताचे आहे सर्व भाजी विक्रेते हे परवाना धारक आहेत ते गेली 35 वर्षांपासून या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत.त्यांची मागणी होती की आम्हाला गाळे बांधून द्यावेत सदर जागेवर महानगरपालिका भाजी मंडई बांधणार आहे व त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे मात्र कन्सल्टंट ने सादर केलेल्या डिझाईन नुसार सर्व परवाना धारकांना तिथे गाळा देणे शक्य नाही .त्यात भाजी पाला हे देखील तात्काळ नाशवंत होणारी गोष्ट असल्याने सर्व परस्थितीचा विचार करून सर्व परवाना धारकांना आहे त्या ठिकाणी गाळे बांधून दिले आहेत.काही नवीन चेहरे घेऊन फिरणाऱ्या विरोधकांना पिंपरी विधानसभा क्षेत्रातील कष्टकरी ,हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची परस्थिती याची जाणीव नाही त्यामुळे फक्त राजकीय हव्यासापोटी फक्त विरोधाला विरोध म्हणून अपप्रचार करत आहेत.मात्र जेव्हा कधी माझ्या कष्टकरी व्यापारी लोकांच्या हितासाठी काही चांगलं करायची वेळ येईल तेव्हा मी मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली.

भर पावसात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आमदार अण्णा बनसोडे यांनी ह्या गाळ्याचे उदघाटन केले.आजच्या या उदघाटन प्रसंगी मा नगरसेवक संदीप वाघेरे,मा नगरसेवक निलेश पांढरकर,सावित्रीबाई फुले भाजी व्यवसाय मार्गदर्शक संघाचे अध्यक्ष संतोष वडमारे,प्रमुख संघटक रमेश शिंदे,कार्याध्यक्ष गौतम रोकडे, प्रविण वडमारे, बाळासाहेब शिंदे व इतर परवानाधारक भाजी विक्रेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *