ज्येष्ठ शिवसैनिक, शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश वाडकर यांचा विधायक उपक्रम…
पिंपरी – भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या 50 नागरिकांना ज्येष्ठ शिवसैनिक, वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य, शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश दिनकर वाडकर यांच्या वतीने महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
निगडी, प्राधिकरण येथील संत ज्ञानेश्वर चौकात शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा फुले, लोकशाही अण्णा भाऊ साठे आदी महापुरुषांची पुस्तके नागरिकांना भेट म्हणून देण्यात आली. यावेळी महेश सापते, रविंद्र चौधरी, सुरेश ठोंबरे, सुनिल म्हस्के, प्रविण वाडकर, ज्ञानेश्वर शिंदे, नारायण ओंबळे, चंद्रकांत जमदाडे, दिलीप गोसावी, सुहास पाटकर, रमेश ढमढेरे, प्रविण वाडकर, गणेश वाडकर, प्रफुल्ल पोटफोडे, महेंद्र महाजन, संजय भिलारे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याबाबत ज्येष्ठ शिवसैनिक, शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश वाडकर म्हणाले, ”सध्याच्या काळात वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. मात्र, सोशल मीडियाच्या जमान्यात प्रत्येकाचेच वाचन कमी झाले आहे. वाचन संस्कृती वाढावी, महापुरुषांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सुमारे 50 नागरिकांना महापुरुषांची पुस्तके भेट देऊन आगळा वेगळा असा विधायक उपक्रम राबविला आहे.”