पिंपरी – संततुकाराम नगर येथील ध्वजारोहण प्रसंगी आण्णा जोगदंड यांनी तिरंगा ध्वजाचा मान राखून, स्वतंत्र सैनिक, वीर हुतात्मे यांच्या भावनेचा व कार्याचा सन्मान करून मी भारताचा विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल अशी उपस्थितांना शपथ दिली.

भारतीय नागरिकांनी आपण सर्व जण प्रथम भारतीय आहोत. सर्वांनी एकोप्याने गुण्या गोविंदाने राहून जात,धर्म, वंश याचा भेदभाव न करता आपण सर्वजण एकाच भारतमातेचे पुत्र आहोत याची सर्वांनी जाण ठेवावी. आप आपसातील मनभेद,व मनभेद बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र आले पाहिजे असे मत जोगदंड यांनी मांडले.
प्रकाश घोरपडे म्हणाले की भारतात दहशतवाद, जाती धर्म ,मतभेदाने भारतात थैमान घातले आहे हे देशासाठी घातक आहे .

गुणवंत कामगार सुदाम शिंदे यांनी असे सांगितले की माझ्या उमेदीच्या काळात मी कामगार मंडळाला खोली बांधून देण्याचे मी काम केलं तसेच मैसूर ,बेंगलोर परदेशी कामगारांच्या सहलीचे आयोजन केले. जवळपास राज्य शासनाच्या 200 कल्याणकारी योजना कामगार आणि कामगार कुटुंबियापर्यंत पोहोचण्याचे मी कामगार काम केले आहे .एक खंत आहे की गुणवंत कामगार पुरस्काराने फक्त पुरस्कार मिळवण्यासाठी काम करु नये मोजकेच  गुणवंत कामगार अजूनही चांगले काम करताना दिसत आहेत.

यावेळी केंद्र संचालक अनिल कारळे यांनी  मंडळाच्या शिवण काम वर्ग,हस्तकला वर्ग,शिष्यवृत्ती योजना, पाठयपुस्तक योजना, अशा अनेक कामगारासाठी व कुटुंबासाठी शासनाच्या कल्याणकारी योजनाची माहिती दिली तर त्यांनी केंद्रात येऊन जास्तीत जास्त कामगारांनी कामगार कल्याण मंडळाचे  सभासद होण्याची आव्हान ही केले .

गुणवंत कामगार यांच्या रॅलीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते किरण कोळेकर यांनी केले.त्यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
हभप शामराव गायकवाड म्हणाले कि पूर्वीच्या काळात सर्वांना समाज एकसंध ठेवण्याचे काम हे सांप्रदायिक क्षेत्रातुन होत असे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे करत होते ते आधुनिक काळात कामगारांना एकत्र करण्याचे काम हे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगारांना एकत्र करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्र संचालक अनिल कारळें केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे,प्रमुख पाहुणे अण्णा जोगदंड, प्रकाश घोरपडे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, सामाजिक कार्यकर्ते किरण कोळेकर ,गुणवंत कामगार काळुराम लांडगे, संगीता जोगदंड, दत्तात्रय अवसरकर, शिवराम गवस ,ह भ प शामराव गायकवाड, सुदाम शिंदे, गोरखनाथ वाघमारे, बाळासाहेब  साळुंके, महिंद्र गायकवाड गुणवंत कामगार उपस्थित होते तर मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या महिला अध्यक्षा सौ संजना करंजवणे, परशुराम पवार, सारंगी करंजवणे, मरळ प्रतिभा, राहुल शेंडगे, पंडित वनसकर, सचिन नेमाडे, मोहिनी गायकवाड, सूर्यकांत मांढरे, जयश्री माने,  प्रतिष्ठा ठोसर, सत्वशीला जाधव,शैलेजा आवाडे,संगिता क्षीरसागर,सह अनेक कामगार उपस्थित होते.

आनिल कारळे यांनी सुत्रसंचालन केले तर सुरेखा मोरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *