पिंपरी : रुपीनगर-तळवडे भागात अवकाळी पावसामुळे श्रीराम कॉलनी मध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली होती. त्या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले, त्यामुळे त्या परिसराची पाहणी करण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांचे सूचनेनुसार त्यांचे बंधू कार्तिक लांडगे, मा.नगरसेवक शांताराम बापू भालेकर, स्वी.नगरसेवक पांडुरंग भालेकर, भाजपा पदाधिकारी किरण पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल भालेकर, शरद भालेकर, रामदास कुटे, रविराज शेतसंधी, अजय रासकर, कुणाल पाटील, रवी एकसिंगे इत्यादींनी घटनास्थळाची पाहणी करून कार्तिक लांडगे व मा.नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी स्थापत्य विभागाचे जूनियर इंजिनियर कुंभार साहेब व शिंदे साहेब यांना घटनास्थळावर बोलावून घेऊन ज्या अडचणीमुळे लोकांच्या घरात पाणी जाते तो छोटा व अरुंद पुल मोठा करण्याचे व जास्त मोठे पाईप टाकून पुल मोठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या व त्वरित पुलाचे काम सुरू करण्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी श्रीराम कॉलनी परिसरातील स्ट्रॉम वॉटर दुरुस्ती, ड्रेनेज दुरुस्ती, नाला साफ करण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.