पिंपरी – चिंचवड येथील बिर्ला हॉस्पिटल शेजारी असलेल्या पुला शेजारील परिसरातून आत्महत्येच्या उद्देशाने पाण्यात उडी घेतलेली एक महिला पाण्यात वाहत आहे याचा फोन चंद्रकांतदादा यांना आला त्यावेळी तात्काळ तेथे जाऊन तेथील नदीपात्राच्या ठिकाणी घोड्यांना पाणी पाजण्यासाठी आलेल्या युवकांच्या मदतीने सदर महिलेला बाहेर काढण्यात आले. व त्या महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
शेजारीच असलेल्या जिजाऊ पर्यटन केंद्र येथे काही महिलांना सोबतीला घेऊन सदर पीडित महिलेची संपूर्ण माहिती घेण्यात आली, व त्या महिलेला पूर्ण मदत करण्याचे आश्वासन देऊन, धीर देण्याचे काम केले व तात्काळ चिंचवड पोलीस स्टेशन यांना कळवण्यात आले व सदर पीडित महिलेस योग्य ती मदत करावी अशा सूचना यावेळी त्यांनी दिली. व सदर पीडित महिलेस पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.