पिंपरी (दिनांक : १५ जून २०२४):- चिंचवड येथील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुभाष चटणे यांना नुकताच राज्यस्तरीय विद्यानिकेतन पुरस्कार २०२४ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील वाई येथे संपन्न झालेल्या विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था आयोजित राज्यस्तरीय विद्यानिकेतन पुरस्कार सोहळा २०२४ अंतर्गत सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या मंजूषा गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सुभाष चटणे यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.