पिंपळे गुरव – साडेचार वर्षापासून प्रलंबित महाराष्ट्र साहित्य परिषदेची पिंपळे गुरव,सांगवी शाखा व्हावी यासाठी पिंपळे गुरव भागातील ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांनी हरिओम निवास,भालेकरनगर, पिंपळे गुरव येथे दि.११ जूनपासून १४ जूनपर्यंत अन्नत्याग उपोषण केले. दरम्यानच्या काळात पिंपरी-चिंचवड शहर भाजपाध्यक्ष शंकरशेठ जगताप यांनी उपोषण स्थळी जाऊन सुरेश कंक यांच्यासह अनेक साहित्यिकांची भेट घेतली. त्या प्रसंगी ते म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने विकसित होत आहे.शहराची लोकसंख्याही तीस लाखाहून अधिक झाली असून या परिक्षेत्रात साहित्य चळवळ मोठ्या प्रमाणात चालू आहे.या ठिकाणी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दोन शाखा पूर्वीपासून कार्यरत आहेत.परंतु लोकसंख्येच्या आणि येथील साहित्यिकांच्या मानाने या शाखा अपुऱ्या पडतात. या विशालकाय महानगरीमध्ये त्यांच्या कार्यास मर्यादा येतात.त्यामुळे येथे आणखी एक शाखा व्हावी,या मागणीसाठी सुरेश कंक गेल्या साडेचार वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.त्यांची ही मागणी रास्त आहे असून त्या अनुषंगाने त्यांनी केलेले उपोषण योग्य आहे.त्याचा सकारात्मक विचार व्हावा,ही अपेक्षा.”

ते पुढे म्हणाले,”त्या दृष्टिकोनातून दि.१४ जून रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे,शहराचे वैभव असलेले ज्येष्ठ विचारवंत आदरणीय मधु जोशी आणि प्रतिनिधी मंडळ यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुरेश कंक यांनी उपोषण सोडले.ही अतिशय सकारात्मक आणि आश्वस्त करणारी बाब आहे.येत्या काही दिवसात महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे त्यांच्या कार्यकारणी मीटिंगमध्ये पिंपळे गुरव, सांगवी शाखेच्या संदर्भात विचारमंथन होईल,व्हावी अन् एकमुखाने मसापची पिंपळे गुरव,सांगवी शाखा अस्तित्वात यावी,ही माझी अन् सर्व साहित्यिकांची इच्छा आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे हे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे.त्या प्रीत्यर्थ मी “लक्ष्मणभाऊ जगताप कला व क्रीडा अँकॅडमी पिंपळे गुरव”च्या वतीने पिंपळे गुरव सांगवी शाखेसाठी सुरेश कंक यांस पाठिंब्याचे पत्र देत आहे.”

अशाच आशयाची पाठींबा देणारी पत्रे विविध संस्थांनी दिलेली आहेत. त्यात नवयुग साहित्य शैक्षणिक मंडळ, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड साहित्य मंच,माजी नगरसेवक सागर आंघोळकर, दिलासा साहित्य सेवा संघ,मधुश्री कला अविष्कार,रमाई महिला प्रतिष्ठान पिंपळे गुरव, सिद्धार्थ सेवा संघ पिंपळे गुरव,भागीरथी प्रकाशन, काव्यात्मा साहित्य परिषद आणि वसुंधरा पर्यावरण संवर्धन प्रतिष्ठान या संस्थांचा समावेश आहे.

याप्रसंगी तानाजी एकोंडे, विवेक कुलकर्णी, आय.के. शेख,आण्णा जोगदंड, मुरलीधर दळवी, भाग्यश्री कंक,उत्तम जोगदंड, हभप अशोक महाराज गोरे, राजू जाधव, मल्लिकार्जुन इंगळे, तुळशीराम जगदाळे, विकास सूर्यवंशी, मीरा कंक, सुनील बर्वे,विनायक बक्षी, सुनील देवकर,विद्या कंक, रमेश जगताप,जीवन जाधव, क्रांती पोतदार, बाळासाहेब गस्ते, नितीन जाधव,रवींद्र कंक, विजय देशमुख,हेमंत कंक,सुभाष चव्हाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *