पिंपरी : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणूक होणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. तीनही मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची ताकद आहे. त्यामुळे विधानसभेला शहरात भाजप विरूद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. तीनपैकी पिंपरी विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडे यांच्या विरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून माजी आमदार गौतम चाबुकस्वार प्रबळ दावेदार आहेत.

त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहर प्रमूख सचिन भोसले हे देखील इच्छुक आहेत. यांशिवाय माजी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, शरद पवार गटाचेच सामाजिक न्याय विभागाचे मयुर जाधव, व देवेंद्र तयाडेही इच्छूक आहेत.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सुरेश लोंढे हे आहेत.

कॉंग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे हे गेल्या चार वर्षांपासून जोमाने तयारीला लागलेले आहेत त्यांनी आता पर्यंत अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच महीला सबलीकरण यावर भर दिला आहे अन्याय अत्याचारांना वाचा फोडण्यामध्ये चंद्रकांत लोंढे यांना पिंपरी चिंचवड शहरात यश आलेले आहे. अशा कामाच्या जोरावरती पिंपरी विधानसभेतून चंद्रकांत लोंढे हे नाव महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत.

असे अनेक दिग्गज गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. नुकताच लोकसभा निवडणुकीचा धुरळा उडाला. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागला. आता या निकालाच्या आधारे राजकीय आडाखे बांधत सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. येत्या सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अवघ्या दोन-अडीच महिन्यावर येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही विधानसभेसाठी राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

शहरातील तीनपैकी पिंपरी हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी (एससी) राखीव आहे. या मतदारसंघात २००९, २०१४ आणि २०१९ अशा आतापर्यंत तीनवेळा झालेल्या निवडणुका अटीतटीच्या झालेल्या आहेत. जय आणि पराजयाचे अंतर अगदी कमी मतांचे राहिले असून आगामी निवडणुकीसाठी या मतदारसंघात अनेक इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांच्या मागे पिंपरी कॅंम्प मधील माजी नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी यांची ताकद आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे. तसेच प्रस्थापित मिडियाच्या माध्यमातून यांनी यंत्रणा सक्षम यंत्रणा तयार आहे.

याशिवाय भाजपकडून अमित गोरखे तीव्र इच्छुक आहे. ते पिंपरी मतदारसंघात कायम संपर्क ठेवून आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपला मिळणे अवघड आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे यांचेही नाव आमदारकीच्या स्पर्धेत आहे. २०१४ च्या निवडणुकीत सोनकांबळे यांनी या मतदारसंघात कडवी टक्कर दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. २०१४ च्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून सुरेश लोंढे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनाही पिंपरी विधानसभेचा अभ्यास आहे. असे पिंपरी विधानसभेत इच्छुकांची भाऊ गर्दी दिसत आहे मात्र महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांच्याकडून कुठल्या उमेदवाराला तिकीट मिळेल तसेच प्रस्ताविक पक्षाकडून उमेदवारी मिळते व कोण अपक्ष लढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *