सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचा संयुक्त उपक्रम…

पिंपरी, पुणे (दि. ०५ नोव्हेंबर २०२३) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट द्वारे संचालित पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे सौर उर्जेवर चालणारे हवामान, वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क (सीयुएनवाय) आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या द्वारे या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
यूएस कॉन्सुलेट जनरल- मुंबई द्वारे ब्रॉन्क्स समुदायाला प्रदान केलेल्या अनुदानाद्वारे हवामान केंद्र उभारण्यात आले आहे. हा प्रकल्प बीसीसी, सीयुएनवाय आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्यातील सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. हा प्रकल्प सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कचे रसायनशास्त्र विभागप्रमुख, अर्थ आणि एन्व्हायरमेंटल सायन्स प्राध्यापक नील फिलिप्स आणि प्राध्यापक परिमिता सेन यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेला आहे. हे हवामान केंद्र विस्तृत प्रमाणात हवामान संबंधी डेटा जसे तापमान, आर्द्रता, सौर विकिरण, अतिनील किरण, आर्द्रता आणि हवेची गुणवत्ता गोळा करणार आहे. जमा झालेला डेटा डेव्हीस वेदर लिंक ॲपद्वारे रिअल टाईम मध्ये उपलब्ध होणार असून, त्याचा फायदा हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त होणार आहे.
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या हवामान केंद्राचे महत्त्व अधोरेखित केले.

पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे , इंटरनॅशनल रिलेशन च्या डीन डॉ. रोशनी राऊत यांनी या प्रकल्पाच्या सहयोगी स्वरूपावर प्रकाश टाकला. या निमित्ताने प्राध्यापकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. या मध्ये, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापक वर्ग देखील सहभागी झाला होता. या प्राध्यापकांना प्राध्यापक नील फिलिप्स आणि प्राध्यापक परिमिता सेन यांनी मार्गदर्शन केले. या दोन्ही प्राध्यापकांबरोबर प्राध्यापकांचा मुक्त संवाद आयोजित करण्यात आला होता.

पीसीसीओई च्या विद्यार्थ्यांनी आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये विद्यार्थ्यांनी हवामान बदलासंबंधी पोस्टर बनविले होते. पोस्टर प्रेझेंटेशनसाठी स्थापत्य विभागाचे प्रमुख डॉ. संदीप माळी यांनी पुढाकार घेतला. पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, जगापुढे समस्या बनत असलेले वातावरणातील बदल, त्यापुढील उपाय आणि आवश्यक असणारे संशोधन यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

या उपक्रमास पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा दिल्या आणि सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
———————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *