डॉ. अशोक शिलवंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ सोमवारी पुरस्कार वितरण…
श्रीपाल सबनीस, श्रीनिवास पाटील, जयंत पाटील, सचिन इटकर, रतनलाल सोनग्रा यांची प्रमुख उपस्थिती
संजय आवटे, जयदेव गायकवाड, भाऊसाहेब डोळस, चंद्रकांत शेटे, अरुण खोरे, स्वाती सामक यांना पुरस्कार जाहीर…

पुणे, पिंपरी (दि.६ ऑक्टोंबर २०२३)अशोक सर्वांगीण विकास सोसायटी व अशोक नागरी सहकारी बँकेचे संस्थापक स्मृतिषेश डॉ. अशोक शीलवंत यांच्या तृतीय स्मृती दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजता पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे विविध पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा शीलवंत धर यांनी शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी आचार्य रतनलाल सोनग्रा, महेंद्र भारती, अशोक नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. राजरत्न शीलवंत आदी उपस्थित होते.
डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांनी सांगितले की, या पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्योजक सचिन इटकर, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच डॉ. अशोक शीलवंत यांच्या नावाने धम्मदीप पुरस्कार दैनिक लोकमतचे पुणे आवृत्ती संपादक संजय आवटे, समाजभूषण पुरस्कार माजी आमदार ॲड.जयदेव गायकवाड आणि बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस, विद्या भूषण पुरस्कार इंद्रायणी शिक्षण संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, पत्रकार भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आणि काव्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ कवयत्री स्वाती सामक यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
लेणी संवर्धन व विहार संवर्धन समिती सन्मान सोहळा व ज्येष्ठ साहित्यिक बाबा भारती यांनी अनुवादित केलेल्या धम्मपद ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे पुस्तक प्रकाशन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. अशोक शिलवंत यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. राजरत्न शिलवंत यांनी केले.
————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *