पिंपरी :- पिंपरी चिंचवडचे पॉवरफूल नेते आझमभाई पानसरे यांनी शरद पवार यांची भेट घेउन जाहीर समर्थन दिले. नुकतीच राष्ट्रवादीने तुषार कामठे या तरुण चेहऱ्याला अध्यक्षपदी संधी दिली. आणि लगेचच कामाठे पक्षवाढीसाठी कामाला लागले. यावेळेस त्यांनी थेट पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेउन असणारे एक नेते म्हणजे आझमभाई पानसरे यांनाच आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरु केले.

आजही आझमभाई म्हणतील ती पूर्व दिशा असा आदेश खाली न पडू देणारे लाखो कार्यकर्ते पानसरे यांच्याकडे आहे. आझमभाई पानसरे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली आणि आपला जाहीर पाठिंबा देऊ केला.यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तुषार कामठे उपस्तिथ होते. यावेळी पानसरे म्हणाले की शरद पवार साहेबांच्या काही धोरणी निर्णयाने पिंपरी चिंचवड शहर मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते आणि यामुळेच मी साहेबांसोबत आलो आहे. आता शहराचे राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष तुषार कामठे यांच्यासोबत भाजपाकडून पालिकेची सत्ता खेचून आणणार आहे.

गेले काही दिवस तुषार कामठे यांची टीम सतत पानसरे यांच्या संपर्कात होती. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी तुषार कामठे आणि रविकांत वरपे यांच्या समवेत आझम भाई पानसरे यांच्या घरी राजकारणाची खलबतं सुरु केली होती. आझमभाई यांच्या अनेक भेटी गाठीमध्ये तुषार कामठे यांच्या सोबत सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, शिरीष जाधव,काशिनाथ जगताप,मुख्य प्रवक्ते माधव पाटील,राजन नायर, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ यांचा समावेश होता.

आझमभाई यांना मानणारा वर्ग पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे कामठे यांच्या राजकीय खेळीने येणाऱ्या काळात पानसरे यांचा शरद पवार साहेबांना पाठिंबा भाजप आणि अजित पवार गटाची चिंता वाढवू शकतो हे नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *