पिंपरी :- रुपीनगर परिसरातील विकास हाऊसिंग सोसायटी येथील उघड्यावरील HT आणि LT वीजवाहिन्यांमुळे रुपीनगर भागात नागरिक व लहान मुलं यांचा स्पर्श झाल्यामुळे अपघाताच्या घटना समोर आल्या होत्या. या अपघातात स्पर्श अतुल बेळे (वय 12) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या पार्श्वभूमीवर या परिसरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी मा.नगरसेवक शांताराम बापू भालेकर व सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांच्या मागणीमुळे आणि सततच्या पाठपुरवठ्यामुळे भाजपा आमदार महेश दादा लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार, वीज वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरू झाले.
रुपीनगर येथील तांत्रिक कारणामुळे अर्धवट राहिलेल्या विकास सोसायटीमध्ये विक्रम हिवरे यांच्या घरी 3/10/2023 रोजी शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मा.नगरसेवक शांताराम बापू भालेकर व संदीप जाधव यांच्याकडे तक्रार करायला सुरुवात केली आणि हे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी केली त्यावर मा.नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी त्वरित आमदार महेश दादा लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांच्याशी संपर्क करून त्वरित अपघात घडलेल्या ठिकाणी येण्यास सांगितले व संबंधित ठिकाणी आल्यानंतर एमएसईबी अधिकारी ज्युनिअर इंजिनियर गरजे साहेब व विलास चव्हाण यांना घटनास्थळी बोलावून घेतले व 4/10/2023 रोजी सकाळी 12 वाजता मीटिंग करायचे नियोजन ठरले त्यानुसार भोसरी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी देवकर साहेब यांच्यासोबत 4/10/2023 रोजी माननीय महेश दादा लांडगे कार्तिक लांडगे, शांताराम बापू भालेकर, संदीप भाऊ जाधव, नितीन बोंडे, शिरीष उत्तेकर, राहुल पिंगळे यांनी देवकर साहेबांना त्वरित काम करण्याचे विनंती केली व त्यानंतर एम एस सी बी चे वरिष्ठ अधिकारी महेश दादा लांडगे इत्यादी मान्यवरण उपस्थित राहून दुसऱ्या दिवशी म्हणजे 5/10/2023 रोजी राहिलेल्या कामाची सुरुवात केली. पुन्हा कुठलाही अपघात होऊन गंभीर प्रकार घडू नये यासाठी एका दिवसात कामाला सुरुवात केली त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण होते सदर कामाचे उद्घाटन आमदार महेश दादा लांडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी देवकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी
अतिरिक्त कार्यकारी अभियंता हंताटे मॅडम, माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, माजी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, रमेश शेठ भालेकर, शितलताई वर्णेकर, अस्मिताताई भालेकर, रुपीनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन कदम साहेब,माजी अध्यक्ष पतंगे सर, शिवसेना उपशहर प्रमुख बळीराम जाधव, रमेश पाटोळे मामा, दत्तात्रय कुंभार, एस के चव्हाण, दाभाडे काका, मोहन आप्पा शेवाळे, ज्ञानेश्वर माऊली भालेकर, गोरक्ष पाटील, चव्हाण ताई,कडूसगावच्या उपसरपंच रंजना पानमंद, सुमन ताई काकडे, लाटे ताई, एम एस ई बी कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब, काळे महाराज, सोमनाथ मेमाने, अनिल भालेकर, शिरीष उत्तेकर, देशमुख साहेब, अभिजीत गिरी,विक्रम हिवरे, भाऊसाहेब सावंत, विकास सपकाळ, अजय गायकवाड, भाऊसाहेब काळोखे, साईनाथ ढाकणे, सिद्धेश्वर बाप्पा जाधव, शिवसेना शाखाप्रमुख राहुल पिंगळे, बिभीषण पोकळे, कमलेश भालेकर, रामदास कुटे, मयूर बोडके, करण उबाळे, विलास अबूज, दिग्विजय सवाई, नयन भोसले, सचिन गायकवाड, निशांत सोमवंशी. तसेच परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
