राहुल गांधी यांच्यावरील कारवाई मुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष…
पिंपरी, पुणे (दि.३० मार्च २०२३):- काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेमध्ये केंद्र सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भांडवलदार गौतम अदानी यांचे संबंध काय आहेत असे प्रश्न विचारले होते. तसेच गौतम अदानी यांच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कोठून आली आहे याचे उत्तर देण्याऐवजी हुकूमशाही पद्धतीने खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव भाजप सरकारने केला आहे. सर्व सामान्य नागरिकांसाठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी संसदेत खासदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार का करत आहे याचा जाब विचारण्यासाठी आता नागरिक रस्त्यावर उतरून सत्याग्रह आंदोलन करत आहेत असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.
खा. राहुल गांधी यांचे खासदार पद सुरत येथील न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत मोदी सरकारने तडकाफडकी रद्द केले. याचा निषेध करण्यासाठी चिंचवड थरमॅक्स चौक येथे काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी “पहले लढे थे गोरोंसे, अब लढेंगे चोरोंसे” अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
या सत्याग्रह आंदोलनात माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, ज्येष्ठ नेते गौतम अरकडे, शिक्षण मंडळ माजी सभापती अभिमन्यू दहितुले, महिला शहराध्यक्ष सायली नढे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, मागासवर्गीय शहराध्यक्ष विजय ओव्हाळ,भाऊसाहेब मुगुटमल, डॉ. मनीषा गरुड, छायावती देसले, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, बाबा बनसोडे, मिलिंद फडतरे, जेव्हीयर ॲन्थोनी, निखिल भोईर, आण्णा कसबे, गौतम ओव्हाळ, सुनिल राऊत, अमर नाणेकर, लक्ष्मण रुपनर, अबुबकर लांडगे, भास्कर वानखेडे, हरिष डोळस, हिरा जाधव, दहर मुजावर, फिरोज तांबोळी, किरण नढे, दिपक भंडारी, आकाश शिंदे, सागर वाघमारे, गणेश भांडवलकर, डॉ. संदीप बाहेती, धनाजी येळकर पाटील, गणेश सरकटे पाटील, सुरेश वाबळे, सुरज गायकवाड, रावसाहेब सरवदे, कचरू सरवदे विठ्ठल सरवदे, श्रीरंग जोगदंड, भिवाजी वाळके, लालचंद जयस्वाल, अनिल बनसोडे, सुग्रीव लोंढे, अर्जुन गव्हाणे, सर्जेराव महानवर दिलीप जोंधळे जितेंद्र छा, कांताबाई गाडे, सुनीता गाडे आदींनी सहभाग घेतला होता.