पिंपरी,ता. १९ : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी शनिवारी (ता. १८) सायंकाळी काढलेल्या पदयात्रेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. शेकडो मतदार या पदयात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये तरुण, महिला, युवती अशा सर्वांचाच सहभाग लक्षणीय होता.
नखातेवस्ती, दत्तनगर कॉलनी, नखातेनगर, गजानन नगर, महाराष्ट्र नगरी, राहटणी फाटा, अमरदिप कॉलनी, श्रीनगर कॉलनी, छत्रपती चौक, रायगड कॉलनी, यशवंत कॉलनी, बळीराज कॉलनी, गोडांबे चौक, छत्रपती चौक, साईविश्व चौक, आझाद चौक, जीवन चौक, क्रांतिवीर चौक, पवना चौक, पंचनाथ चौक, आठवण हॉटेल, अल्फान्सो शाळा, गणेश चौक, मोरया कॉलनी, पवनानगर, काळेवाडी संपूर्ण परिसर असा पदयात्रेचा मार्ग होता. या पदयात्रे दरम्यान राहुल यांचे ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने जंगी स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण केले. दादांना ठिकठिकाणी हात उंचावून नागरिक अभिवादन करीत होते. कलाटे या अभिवादनाचा स्वीकार करीत होते.
‘येऊन येऊन येणार कोण? राहुल दादांशिवाय आहेच कोण’ , ‘ एकच वादा, राहुलदादा ‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिट्टी चे बटण दाबून प्रचंड मताधिक्याने दादांना विधानसभेत निवडून द्या, असे आवाहन कलाटे यांचे कार्यकर्ते करीत होते. सुमारे साडेतीन ते चार तास ही पदयात्रा चालली .पदयात्रे दरम्यान येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून कार्यकर्ते वाहनांना वाट करून देत होते.