चिंचवड :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टीच्या व मित्र पक्षाच्या लोकप्रिय उमेदवार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांनी महत्त्वपूर्ण मीटिंग घेतली. सदर मीटिंगमध्ये अश्विनीताई जगताप यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन आदेश रामदास आठवले यांनी दिले रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या पाठीशी उभा राहतो तो उमेदवार शंभर टक्के विजयी होतो व रिपब्लिकन पक्षाची युती भाजप बरोबर असल्याकारणाने आरपीआयच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मतदारांनी अश्विनीताईंना मतदान करावे अशी विनंती केली. लक्ष्मण भाऊ जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराचा अत्यंत महत्त्वाचा विकास केला आहे या शहराच्या विकासासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे असे पक्षनिष्ठ व प्रामाणिक नेत्यांना श्रद्धांजली व्हायचे असेल तर आपले बहुमोल असणारे मत अश्विनीताई जगताप यांना म्हणजेच कमळाला द्या.
या मीटिंगसाठी स्वतः उमेदवार अश्विनीताई जगताप शंकर शेठ जगताप एकनाथजी पवार चंद्रकांताताई सोनकांबळे बाळासाहेब भागवत, परशुराम वाडेकर, स्वप्निल कांबळे, कुणाल वाव्हळकर, ईलाबाद ठोसर, कमलताई कांबळे, सुधाकर वारभुवन, सम्राट जकाते,अंकुश कानडी, रमेश चिमूरकर, सिकंदर सूर्यवंशी, अजितभाई शेख, सुरेश निकाळजे, बाळासाहेब रोकडे, विनोद चांदमारे, सुजित कांबळे, अजय झुंबरे,संदीप तोरणे, रुक्मिणी ताई पाटील, बाबा सरोदे, गौतम गायकवाड, श्रीमंत शिवशरण, संजय गायकवाड, अश्विन खुडे बाळासाहेब शिंदे,दुर्गप्पा देवकर, बाळासाहेब काकडे, रेखा काणेकर, स्वप्नील कसबे, अविनाश शिरसाठ इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.