पिंपरी, पुणे (दि. २८ जानेवारी २०२३) चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून २६ फेब्रुवारीला चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसकडे तीव्र इच्छुक उमेदवार आहेत. यापैकी सहा इच्छुकांनी शनिवारी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कार्यालयाकडे आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिली आहे. तसेच उद्या देखील काही इच्छुक उमेदवार अर्ज सादर करतील. याविषयी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने २ फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार उभा केला जावा ही येथील प्रमुख कार्यकर्त्यांची मागणी  ठामपणे मांडू तसेच हा मतदारसंघ शहराच्या राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा आहे. शहरातील करदाता नागरिक मागील सहा वर्षांपासून सुविधांपासून वंचित असल्यामुळे त्रस्त आहे. जनतेची मागणी आहे की काँग्रेसने ही निवडणूक लढली पाहिजे. ही भूमिका शहराध्यक्ष म्हणून मी मांडणार आहे. जर वरिष्ठांनी महाविकास आघाडीचा उमेदवार दिला, तर ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जबाबदारी शहर काँग्रेस घेणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सात फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.
यावेळी चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली मलशेट्टी, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, संभाजी ब्रिगेडचे संजय काळे, छावा संघटनेचे धनाजी येळकर, डॉ. मनीषा गरुड, प्रियंका मलशेट्टी, जमाते उलेमियाचे अध्यक्ष गुलजार भाई, हज्जू शेख, हसन इमाम पटेल, तेलगू समाज संघाचे अध्यक्ष बसवराज शेट्टी, ज्येष्ठ नागरिक संघाचे आनंद फडतरे, महात्मा गांधी व्याख्यानमाला संस्थापक अध्यक्ष बी. आर. माडगूळकर तसेच इस्माईल संगम, सय्यद मुर्तुझा, भारतीताई घाग, स्वप्निल बनसोडे, निखिल भोईर, जेवियर अंथोनी, सौरभ शिंदे, विजय इंगळे, प्रा. किरण खाजेकर, भानुदास ढोरे, तुकाराम कदम, अबूबकर लांडगे, विठ्ठल शिंदे, आकाश शिंदे, सचिन कोंढरे, मिलिंद फडतरे आदींसह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *